ऋषी सहारे
संपादक
आरमोरी-
अतिशय कर्तुत्वसंपन्न, समाजातील तळागाळातील लोकांचे संघटन करून 4 वेळेस अपक्ष आमदार होऊन, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील अपंग, निराधारांचे नेते, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या बांधावर व झोपडीत जाऊन त्यांचे अश्रू पुसणारे, कोरोनाकाळात घरात न बसता २४ तास स्वतःच्या जीव धोक्यात घालून महाराष्ट्राची अहोरात्र सेवा करणारे एकमेव अपंग हृदय सम्राट, प्रहार पक्ष प्रमुख माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस भाऊच्या शिकवणीनुसार ब्यानर व होर्डिंग्ज वर खर्च न करता अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव(भु.) येथील पहिल्या वर्गातील मुलांना नोटबुक व पेन चे वाटप करून शाळेतील सर्व मुलांना माध्यन्ह जेवणात गोड पाहुणचार म्हणून जिलेबीचे वाटप करून कोरोना काळात सेवा बजावणारे डोंगरगाव येथील आशा वर्कर मंगलाताई भुते , विध्याताई ढोरे ,निशाताई बगमारे ,व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सविता चौधरी यांना शाल,श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार करून गौरविण्यात आले तसेच शाळेच्या प्रांगणात शाळेचे मुख्याध्यापक रवींद् सोमनकार यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखीलभाऊ धार्मिक, रिंकू झरकर, अक्षय बोरकर, विकास धंदरे,विनोद निमजे गुरू वाटगुरे, अनंतभाऊ भोयर, गोलू ठाकरे, युवारंग चे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल खापरे, जिल्हा रक्तपेढी चे अध्यक्ष चारुदत्त राऊत इत्यादी चे सहकार्य लाभले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सोमनकार, बोरकर , भोंगे, गेडाम , मेश्राम , चापले म्याडम, मने म्याडम इत्यादी शिक्षक वृंद व विध्यार्थी गण उपस्थित होते