नीरा नरसिंहपूर दिनांक:5
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
सराटी तालुका इंदापूर येथे दोन वर्षानंतर श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी यावर्षी भाविक भक्त व वारकरी वैष्णवांच्या मोठ्या सहभागाने आनंदमय झाला आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम आटोपून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे पदार्पण केले. तत्पूर्वी तुकाराम महाराज पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले.
मुक्कामी सराटी यथे पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या. सकाळी सात वाजता देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, विश्वस्त भानूदास मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे, अजित मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीत स्नान घातले. त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महापूजा व आरती करण्यात आली. भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. हजारो भाविक भक्त व वृध्द, महिला आणि नागरिकांनी रांगेत उभे राहून पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी तुकाराम महाराजांच्या पादुकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलिस निरीक्षक तय्युब मुजावर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय तिडके, शासकीय सर्वच पदाधिकारी आणि कर्मचारी, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सरपंच रमेश कोकाटे, तालुका आध्यक्ष हानुमंत कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, उपसरपंच सचिन कोकाटे, पैलवान रोहित जगदाळे, पैलवान आमर जगदाळे, पैलवान बाबासाहेब कोकाटे, वकील राजू जगदाळे, भैय्या कोकाटे, आदीं भाविक व ग्रामस्थांनी पालखीला सन्मान पूर्वक सराटी गावाने निरोप दिला.
संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो भावीक व वैष्णावांच्या बरोबर भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाली. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपूते, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अकलूज उपविभागाचे पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, अकलूजचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर आदींनी तोफांच्या सलामीने स्वागत केले.
फोटो :-ओळी-
1) तुकाराम महाराज पादुकांना नीरा नदीमध्ये दुग्ध अभिषेक करण्यात आला. 2) लाखो वैष्णवांच्या साक्षीने पालखी सोहळ्याने नीरा नदी ओलांडत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. 3) तुकाराम महाराज पादुकांना नीरा स्नान घालून पुष्प सृष्टी करण्यात आली.
4) तुकाराम महाराज पादुकांची स्नानानंतर आरती करीत आसताना भाविक भक्त.