अकोट प्रतिनिधी

 

महाराष्ट रुग्णसेवक संघटनेचे विदर्भ रत्न पुरस्कार विभुषित योगेश लबडे यांच्या संकल्पनेतुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यामध्ये रुग्णांना उपचार करत असताना भासणारा रक्ताचा तुटवडा पाहता व होणारा रक्त न भेटल्या चा ञास पाहता महाराष्ट्र रुग्णसेवक संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच रुग्ण कल्याण समिती कावसा प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्राम पंचायत वरुर जऊळका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

त्याप्रसंगी राष्ट्रीय प्रबोधनकार माननीय सत्यपाल महाराज चिंचोळकर, योगेश लबडे तसेच पोलीस स्टेशन दहीहंडा ठाणेदार सुरेंद्र राऊत,तसेच सरपंच सौ. ऊषा सतीश काठोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्याप्रसंगी प्रबोधनकार सत्यपाल महाराज आपल्या प्रबोधनातून लोकांना रक्तदानाविषयी प्रेरणादायी विचार त्याबद्दलची मानसिक उत्सुकता निर्माण होऊन रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून प्रत्येकाने रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्त्रियांनी सुद्धा रक्तदान करण्यासाठी समोर यावं व अशा प्रकारचे काम ठीक ठिकाणी आयोजित करून जिल्ह्यातील रुग्णांना भासणारी रक्ताची कमतरता व त्यासाठी होणारी धावपळ होणार नाही. व त्यातून रुग्णाचे प्राण वाचू शकतील त्याकरिता गावोगावी अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाचे महत्त्व समजावून सांगितले कार्यक्रमांमध्ये सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपली उपस्थिती दर्शविली त्या उपस्थितीबद्दल परत परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने तसेच ग्राम पंचायत प्रशासन जवळकाच्या वतीने रक्तदात्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे तसेच उपस्थित सर्व गणमान्य लोकांचे आभार मानले, या प्रसंगी दहीहांडा ठानेदार सुरेंद्र राऊत रक्तदान दिले,चंचलताई पितांबरवाले व पंचायत समिति सदस्य सपना ईश्वरदास झ्यास्कर पती ईश्वरदास झ्यास्कर , शिक्षक सतीश घनबहादुर,निरूपा सतीश घनबहादुर या दोन जोडप्यानी सुद्धा रक्तदान करून दिला, मानुसकी चा परिचय यावेळी सुनिल घनबहादुर, अॅड भुषन घनबहादुर,सतीश काठोळे,चरण इंगळे,मयुर सपकाळ,सुगत वानखडे,मा.सरपंच मनोहर डोके,सतीश घनबहादुर पञकार राजेश सावीकार, विजय धांडे, सचिन घुगे, अंकुश आवारे,प्रतिक तेलगोटे, ऋषिकेश तायडे,शुभम दामले संतोष तेलगोटे,नागेश सरदार सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com