अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
आरमोरी :- जिल्ह्यातील अनेक भागात आज संततधार पाऊस झाला. दरम्यान पावसाने नाले भरून वाहत होते .त्या नाल्यामध्ये वाहत्या पाण्यात मासे पकडण्याचा बेत आखून मासे पकडण्यासाठी गेलेला इसमाला मासे पकडणे जीवावर बेतले आहे.
मासे पकडण्यासाठी नाल्यावर आपल्या सहकार्यासोबत गेलेला एक इसम वाहून गेल्याची घटना आरमोरी तालुक्यातील वसा येथील कोलांडी नाल्याजवळ घडली. राजकुमार एकनाथ राऊत वय 38 राहणार देलोडा बूज. असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव आहे.
मागील 48 तासात जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोरडे पडलेले नदी, नाले , भरून वाहू लागले आहेत. सोमवारी दिवसभर संततधार पाऊस होता. त्यामुळे नाल्यावर मासे पकडण्याचा बेत आखून राजकुमार राऊत हा शंकर लोमेश राऊत, विलास एकनाथ राऊत, ऋषी नामदेव कलसार, व प्रकाश हिरामण मडावी सर्व राहणार देलोडा बूज. यांच्यासोबत वसा येथील नाल्यावर गेला होता.
दरम्यान नाल्यात उतरल्यानंतर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने राजकुमार हा नाल्यात वाहून गेला. यावेळी ऋषि कलसार, प्रकाश मडावी व पुन्हा एक जण हेही पाण्यात बुडाले होते .
मात्र त्यांना मच्छीमारांच्या सहाय्याने वाचवण्यात यश आले.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या पाण्यात मच्छी मारण्याचा बेत आखून नाहक युवकाचा बळी गेल्यामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.