रमेश बामनकर
अहेरी तालुका प्रतिनिधी
पक्षाला नवी उभारी देण्याचे सल्ला दिले
जिल्ह्यातील पक्ष संघटनेविषयी चर्चा झाली
अहेरी:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवार 4 जुलै रोजी शिवसेनेचे अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी मुंबई येथील शिवसेना भवनला भेट घेऊन सविस्तर चर्चा केले.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाला अजून नवी उभारी देण्यासाठी कामाला लागा असा सल्ला देऊन जिल्ह्यातील पक्ष संघटन व विकासात्मक बाबींवर चर्चा केले.
गडचिरोली जिल्हा हे राज्यातील शेवटचा टोक असून पक्ष वाढीसाठी शिवसैनिक प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून शिवसेनेला अजून नवा जोश व उत्साह वाढीसाठी गडचिरोली विधानसभा जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके आणि अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण दिले असता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गडचिरोली जिल्ह्यात येण्यासाठी हिरवा कंदील दाखविले.
नुकतेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदे पक्षात बंडखोरी केले असले तरी गडचिरोली जिल्ह्यात कोणताच फरक पडणार नसून जिल्ह्यातील शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यातील शिवसैनिक कट्टर व सच्चे असल्याचे रियाज शेख आणि वासुदेव सडमेक यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पक्षाविषयी परिस्थिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटीदरम्यान अवगत करून दिले.