वणी : परशुराम पोटे
नगरवाचनालय येथे विदर्भ साहित्य संघ , प्रेस वेलफेअर असोसिएशन, मित्रमंडळ, नगरवाचनालय, जैताई देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने ,
ऊच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विधार्थांचा पुरस्कार देवुन सत्कार करण्यात आला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप अलोणे, प्रमुख अतिथी बाळासाहेब सरपटवार, सौ. सुनंदा गुहे, सागर बरशेट्टीवार कवी हे होते,
सुत्र संचालन राजाभाऊ पाथ्रडकर , प्रास्तावीक अभिजीत अणे व आभार रवी बेलुरकर यानी मानले, हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता गजानन कासावार सर, देवेद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, गजानन भगत यानी परीश्रम घेतले.