डोरली येथुन अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपी अटक. — दोन वाहनासह एकूण ४०,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त.. — ना ग्रा विशेष पथकाची कारवाई..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी

पारशिवनी:-दिनांक ०४/०६/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे पारशिवनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की,०२ टिप्पर डोरली गावाजवळील नदीपात्रातून अवैधरीत्या विनापरवाना रेती (वाळु) लोड करून सींगोरी कडे वाहतुक करीत आहे. 

       अशा खात्रीशीर बातमीवरून पारशिवनी हद्दीतील डोरली येथील वडाचे झाडा जवळील हनुमान मंदीरा लगतचे रोडवर अवैध रेती संबंधाने अचानक नाकाबंदी केली असता ०२ दस चक्का टिप्पर येतांना दिसले. 

        सदरचे वाहने थांबविण्याकरीता इशारा केला असता पुढे असलेल्या टिप्पर चालकाने त्याचे ताब्यातील टिप्पर थांबविले व मागील टिप्पर चालक हा अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.

       थांबविलेल्या टिप्पर क्र. एम एच-४०/बी.जी ४२५३ चा चालक आरोपी नामे आकाश विजय चौरे, वय २६ वर्ष, रा. बिनासंगम ता. कामठी जि. नागपूर यास स्टाफने पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे ०४ ब्रास रेती मिळून आल्याने सदर टिप्पर चालकास टिप्पर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून १) टिप्पर क्र. एम एच-४०/बी.जी ४२५३ किंमती २०,००,०००/- रू. मध्ये ०४ ब्रास रेती किंमती २०,०००/- रू.

 २) १० चक्का टाटा कंपनीचे टिप्पर एम एच-४०/सीडी-६९३१ किंमती २०,००,०००/- रू. मध्ये ०४ ब्रास रेती किंमती २०,०००/- रू. दोन्ही वाहनातील एकुण ०८ ब्रास रेती किंमती ४०,०००/- रू. असा एकुण वाहनासह ४०,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे-१) आकाश विजय चौरे, वय २६ वर्ष, रा. बिनासंगम ता. कामठी जि. नागपूर २) अनवर रा. विटाभट्टी चौक, नागपूर ३) सुरेंद्र ठाकरे ४) सोनु शेख, दोन्ही रा. बिनासंगम यांचेविरुद्ध पोस्टे पारशिवनी येथे कलम ३७९, १०९, ३४ भा.द.वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. पारशिवनी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

        यातील आरोपी क्र. १) आकाश विजय चौरे यास अटक करण्यात आली आहे.

         सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. किशोर शेरकी, बालाजी बारगुले, दिनेश केशपागे, पवन भेंडारकर, बळीराम जायभाये, राजेंद्र गुट्टे, पियुष कुळमेथे, प्रणित वानखेडे, सुरज हिवरकर, शुभम मारोकर विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.