तुषारला दुसरे लग्न करण्यापासून पुनम रोखणार काय? — प्रेम विवाहामुळे नातेवाईक व समाजही तुटला,अन्नासाठी वनवन,आली आयुष्यात सर्व बाजूंनी बदनामी.. — चिमूर पोलीस म्हणतात तुषार दुसरे लग्न करु शकतो,चंद्रपूर पोलिस अधीक्षक काय भूमिका घेणार?वनवन भटकतय पुनम न्यायासाठी,राजकीय हस्तक्षेप असण्याची दाट शक्यता.. — भांदवी कलम १९९,२००, अंतर्गत दिवाणी न्यायालयात दाद मागणार?अन्यथा पुनमचा जिव जावू शकतो?.”निर्धन पुनमला कोण मदत करणार?

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

              लग्नाचे वय झाले की,प्रेम विवाह व आंतरजातीय प्रेमविवाह करण्यास कायदेशीर मान्यता आहे.मात्र समाजमन सदर कायद्याला अजूनही जुमानत नसल्याचे आणि समता प्रस्थापित करण्यासाठी उत्तम विचारातंर्गत योग्य मन बनवत नसल्याचे पुनम प्रकरणावरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.

         चिमूर तालुक्यातील मौजा टेकेपार येथील तुषार मारोती बगडे या नराधमाने पुनमला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आयुष्यभर साथ देण्याचे आश्वासन दिले आणि तिच्यासोबत वरोरा येथील श्री.महादेव देवस्थान येथे १८ नोव्हेंबर २०२१ ला लग्न केले.

        लग्नानंतर चालाख तुषारने पुनमला घरी न नेता चिमूर मध्ये रुम करून ठेवले व मनसोक्त तिचे शारीरिक व मानसिक शोषण केले.याचबरोबर तिला विविध प्रकारचा त्रास देत मरनासंन्न स्थितीत आणून सोडले.

           एवढेच काय तर तुषारने षडयंत्र करून पुनमच्या पहिल्या गर्भधारणे नंतर तिचा गर्भपात करवून घेतले असल्याचे पुनमचे म्हणणे आहे.तदनंतर पुनमला दुसरी गर्भधारणा झाल्यानंतर चिमूरला मैत्रीणिंच्या रुमवर ठेवून आपले तोंड काळे केले.

      पुनमच्या संगोपनाची जबाबदारी पार न पाडता निर्दयी तुषार बगडेसह त्याच्या आई-वडिलांने जात पुढे केली व चारित्र्यवान पुनमच्या चारित्र्याचे धिंडवडे काढले.

             असंवेदनशील विचित्र प्रकार असा की,पुनमने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी व समाजमनांनी तिला निकरण्याचे काम केले आणि साथ सोडली.याच संधिचा फायदा तुषार,त्याचे आई-वडील व पोलीस विभाग घेत असल्याची शंका येऊ लागली आहे.

         तुषार १८ एप्रिल २०२४ ला दुसऱ्यांदा नेरी येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात लग्न करीत असल्याचे पुढे आले आहे व अख्या चिमूर तालुक्यात दुसऱ्या लग्नाबाबत खमंग लोकचर्चा आहे.

           मस्तावलेला तुषार दुसरे लग्न करीत असल्याचे प्रकरण पुढे आल्यावर पुनमने पोलिस स्टेशन चिमूरला लेखी तक्रार दाखल केली.पण चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत तुषार बगडेसह त्याच्या आई-वडिलांवर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक फौजदारी कारवाई न करता केवळ भांदवी कलम ५०६,५०४ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला व हात वर केले आणि पुनमला सांगितले कोर्टात दाद मागावी? गरीबांसाठी अजब हिंदू विवाह कायदा लागू होतो असेच पिडित पुनम प्रकरणावरून व चिमूर पोलिस स्टेशनच्या कार्यपद्धतीवरुन दिसते आहे.

         पुनम प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्यासोबत भ्रमणध्वनी द्वारे एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी चर्चा केली व पुनम प्रकरणाकडे लक्ष देण्याची विनंती केली‌.चंद्रपूर पोलीस अधीक्षक यांनी पुनम प्रकरणाबाबत चिमूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांचे सोबत बोलतो असे सांगितले.पण ते काय करणार हे सध्यातरी गुलदस्त्यातले कोडे आहे.

          चिमूर पोलिस म्हणतात तुषारच काय तर कुठलाही व्यक्ती दुसरे लग्न करु शकतो.यावर बंधने नाहीत.यामुळे दुसऱ्या विवाह संबंधाने कायद्याची स्थिती गोंधळली की चिमूर पोलीस पुनमला गोंधळवून पळवाटा काढीत आहेत हे त्यांनाच माहीत.

          अर्थिक स्थितीने कंगाल असलेली व अन्नाच्या एकाएका दाण्यासाठी तडफडणारी सौ.पुनम तुषार बगडे ही आज चिमूर दिवाणी न्यायालयात भांदवी कलम १९९,२००,अंतर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यासाठी जाणार आहे.मात्र तिला तिचे कर्तव्यबल व कोर्टातील मा. न्यायमूर्ती,सरकारी वकील/खाजगी वकील साथ देताता की नाही हेही सांगणे कठीण आहे.

           बेबंदशाही पुढे संघर्ष करताना सौ.पुनम हतबल झाली असून तीला १७ एप्रिल २०२४ पर्यंत न्याय न मिळाल्यास किंवा पोलिस विभागाने सहकार्य न केल्यास तिचा शेवटचा श्वास १८ एप्रिल २०२४ ठरु शकतो असे तिचे म्हणणे आहे.

           तद्वतच सौ.पुनम तुषार बगडेंच्या प्रकरणात राजकीय व सामाजिक हस्तक्षेप होत असल्याची दाट शक्यता आहे.