कमलसिंह यादव
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
नागपूर
पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील भिमगड येथे आदिवासी समाजाचे आराध्य कुलदैवत भिमालसेन जन्मोत्सव जत्रेचा शुभारंभ ६ एप्रिल ला होणार आहे.
हनुमान जन्मोत्सव पासून भिमालसेन जन्मोत्सवाचा शुभारंभ होणार असून प्रशासन व देवस्थान पंचकमेटी तर्फे सर्वतोपरी तयारी झाली आहे.
यासाठी प्रशासन व यात्रा उत्सव समितीही सज्ज झाली आहे.सदर यात्रा ६ अप्रैल ते १६ अप्रैल दहा दिवस चालणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भिमगड येथे भिमालसेन मंदिर आहे.तेथे दरवर्षी मध्य भारतातील गोड किवा अन्य आदिवासी समाज आणि इतकेच काय तर हिंदू भाविकांची पावलेही चैत्र महिन्यात या मंदिराची वाट पाहत असतात.
गोंड आदिवासीचे चौथे धर्मगुरू असलेले कुमारा भिमलसेन मित्रसेन बाबा यांचा हा जपतीचा काळ असल्याने त्यांच्या या मंदिराकडे चैत्र महिन्यात दररोजच हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात.
६ अप्रैल पासुन १६ अप्रैल पर्यत जनोत्सव जत्रा भरते येथे मनातील इच्छा पूर्ण झालेले भाविक येथे वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्सव साजरे करीत असतात.यात ढोल वाजवून नृत्य करणे,जनावरांचा बळी देणे आणि मांसाहाराचे जेवण शिजवून ते प्रसाद म्हणून खाणे आदी परपरांचा यात समावेश आहे.
या मंदिरात चैत्र महिन्यात भव्य भिमाल सेन जन्मोत्सव जत्रा भरत असते. पहीले दिवसी आदिवासी यांचे आराध्य देवत भिमालसेन यांचे जन्मोत्सव कुवारा भिमसन देवस्थान( भिमालसेन ठाणा) भिमगड येथे भव्य जत्रेचा आयेजनच्या पहिल्या दिवसी सर्वप्रथम सकाळी आराध्य दैवत भिमालसेन याचे अभिषेक करून वस्त्र अपर्ण केली जातात व विधिवत झेन्डा वंदन करून सकाळी ११ वाजता महापुजा केली जाते.
६ एप्रिल पासून दहा दिवसिय जत्रेचा प्रारंभ होतो अशी माहीती देवस्थान भिमगड पंचकमेटीचे अध्यक्ष शांताराम जयसिंग मडावी,सचिव गजानन महादेव अत्राम,विश्वस्त सदस्य शंकरराव मरसकोल्हे,रूपराव बोरकर तसेच देवस्थानचे पुजारी शंकर अलापो यानी दिली असुन पेंच जलाशयाच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिरातील जत्रेच्या काळात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातून हजारो भाविक येथे येत असतात. पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील व पेंच जलाशयाच्या काठावर भिमगड येथे बसलेले कुंवारा भिवलसेन हे तिर्थक्षेत्र सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलव्याप्त निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे.
कुंवारा भिवलसेन हे तिर्थक्षेत्रात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असल्यामुळे आदिवासी कुटुंबीयां सोबत येथे बोललेला नवस फेडण्यासाठी बोकडांचा,कोंबड्यांचा भाव देतात.आदिवासी समाजासाठी हे तिर्थक्षेत्र काशी म्हणून प्रसिद्धीस आहे.