भारतीय विद्या भवनमध्ये ८ एप्रिल रोजी सावरकरांच्या काव्यावर कार्यक्रम…. — भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन….

दिनेश कुऱ्हाडे

 प्रतिनिधी

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचे,त्यांच्याच काव्यातून ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनीवार ,८ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.

        प्रतिभावान लेखक,कवी,राष्ट्रभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनदर्शन उलगडणारा हा सांगीतिक कार्यक्रम जन्मदा संस्था प्रस्तुत करणार आहे.

         संहिता मिलिंद प्रभाकर सबनीस यांची असून संगीत अजय पराड यांचे आहे. अश्विनी पटवर्धन ,कृपा नाईक ,हिमानी नांदे ,देवव्रत भातखंडे ,ओंकार कपलाने,होनराज मावळे ,बिल्वा द्रविड गायन करणार आहेत. चिन्मय वाईकर,ओंकार जोशी साथसंगत करणार आहेत. 

        भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५९ वा कार्यक्रम आहे .