मोखाबर्डी जल उपसा सिंचन योजनेतुन उमा नदीला पाणी सोडण्यात यावे – नेरी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

      चिमुर तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावु लागली आहे.उन्हाळा सुरू झाल्याने पाणी समस्यांना गावकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे उमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने पाणी टंचाईची झड नागरिकांना सहन करावी लागत आहे. 

  पिण्याचे पाणी संबंधाने टंचाईवर मात करण्यासाठी मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतुन उमा नदीला पाणी सोडण्यात यावे अशी मागणी नेरी ग्रामपंचायतीच्या वतीने मोखाबर्डी येथे जावुन अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

    नदी नाल्याचे पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने सध्या एक दिवसाच्या फरकाने नळाला पाणी येत आहे काही दिवसाने ही समस्या दोन दिवसांच्या फरकाने होवु शकते त्यामुळे महीलांना यांचा फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे ही समस्या गावोगावची असल्याने जर का मोखेबर्डीचे पाणी उमा नदीला सोडण्यात आल्यास पाणी समस्या सुटणार आहे. 

     यासाठी नेरी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन मोखाबर्डी उपसा सिंचन येथे जावुन अधिकाऱ्यांना एका निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.

  निवेदन देताना सरपंच रेखाताई नानाजी पिसे,उपसरपंच चंद्रभान कामडी,ग्रामपंचायत सदस्य नाना दडमल,सौ.संगीता कामडी,सौ. संगीता वैरागडे,सौ.ललिता कडुकार,सौ.माया बाई नन्नावरे भाजपा तालुका महीला अध्यक्ष,ग्रामपंचायत कर्मचारी किशोर कामडी,पाणी पुरवठा कर्मचारी भीमराव गुरुनुले उपस्थित होते.