ब्रेकिंग न्यूज… – वृक्षतोडीच्या माहितीवरून पत्रकार केवलसिंग जुनींना धमकी – वनपाल संतोष औतकार यांचा अधिकाराचा गैरवापर…. — धमकी खपवून घेतली जाणार नाही – प्रदीप रामटेके महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ विदर्भ पदाधिकारी… — वनपाल संतोष औतकार यांना सेवेतून बडतर्फ केलेच पाहिजे,अन्यथा आमरण उपोषण….

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक 

भिसी (जि. चंद्रपूर) – राज्यातील जंगलतोडीच्या वाढत्या घटनांमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे.वृक्षतोडीविषयी माहिती मिळवत असताना पत्रकारांनाच धमकी देण्याची धक्कादायक घटना भिसी वनविभागातंर्गत मौजा पारडपार परिसरात येथे आज १ ते २ वाजताच्या सुमारास घडली आहे.

       भिसी वनपरिक्षेत्राचे वनपाल संतोष औतकार यांनी वृक्षतोडीचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांना थेट घटनास्थळीच अर्वाच्य भाषेत धमकी दिली.या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,संतोष औतकार यांच्यावर कठोर कारवाईची मागणी दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ पदाधिकारी प्रदीप रामटेके यांनी केली आहे.

*****

वृक्षतोड वाढली,वनविभाग गाफील का?

     भिसी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असून,या वृक्षतोडीला वनविभागाचे काही अधिकारी व कर्मचारीच अभय देत असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

      या संदर्भात माहिती देऊनही वनविभागाचे अधिकारी गप्प का,हा मोठा प्रश्न आहे.

      अवैध लाकूड तोडी अंतर्गत २ ट्रक माल सहिसलामत भिसी वनविभागाच्या आशिर्वादाने नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे.पत्रकारांनी वारंवार याविषयी माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने संशय अधिकच गडद होत आहे.

        भिसी परिसरात काही ठिकाणी दिवसा आणि रातोरात झाडांची कत्तल केली जात असून,इतर किसम आणि मौल्यवान लाकडांची चोरी सर्रास सुरू आहे. 

       या प्रकरणात स्थानिक राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा असून,अनेक वेळा ट्रक भरून लाकूड वाहून नेले जात असतानाही वनविभाग काहीच कारवाई करत नाही.उलट जे लोक हे प्रकार उघड करत आहेत,त्यांनाच धमकावले जात आहे.

******

वृक्षतोडीची माहिती देणाऱ्या पत्रकारांना धमकी….

    गेल्या काही दिवसांपासून काही पत्रकारांनी वृक्षतोडीच्या घटनांवर लक्ष केंद्रित केले होते. वृक्षतोडीची माहिती मिळताच पत्रकार केवलसिंग जुनी घटनास्थळी पोहोचले.

         वनपरिक्षत्राधिकारी किशोर देऊळकर यांना संपादक प्रदीप रामटेके यांनी तोडलेले वृक्ष ट्रक मध्ये भरत असल्याची माहिती भ्रमणध्वनी द्वारे दिल्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार तिथे आसलेल्या वनपाल संतोष औतकार आले.पत्रकार केवलसिंग जुनी वृक्षतोड व वृक्ष भरलेला ट्रक आताच गेला असल्याची माहिती त्यांना देत असतानाच वनपाल संतोष औतकार धमकावत म्हणाले,”मधात बोलू नका, नाहीतर अंदर करीन,” अशा शब्दांत धमकी दिली. 

       यावरूनच स्पष्ट होते की,वृक्षतोड करणाऱ्या माफियांना त्यांचे संरक्षण मिळत आहे आणि या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे.

       पत्रकारांवर असा दबाव टाकणे ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच हल्ला आहे.लोकशाहीत प्रसारमाध्यमांना सतत दडपले जाणे ही धोक्याची घंटा आहे.त्यामुळे संतोष औतकार यांच्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी रेटून धरण्यात येणार आहे.

****

वृक्षतोडीतून लाखोंचा गैरव्यवहार?

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार,भिसी वनक्षेत्रात गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचे वृक्ष अवैधपणे तोडले गेले आहेत.या झाडांचे लाकूड ट्रक भरून बाहेर पाठवले जात आहे नुकतेच एका मोठ्या ट्रकने लाकूड भरून नेले जात असताना पत्रकारांनी त्याचा फोटो काढत असताना तो ट्रक काही क्षणांतच पसार झाला.

        याबाबत प्रश्न उपस्थित होतो की,हा ट्रक कुणाच्या सांगण्यावरून पळवण्यात आला? ट्रकचा मालक कोण? जर वनविभाग सतर्क असता,तर हा ट्रक पसार कसा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली,तरच सत्य बाहेर येऊ शकेल.

*****

वनपाल संतोष औतकार यांना सेवेतून बडतर्फ करा!

      संतोष औतकार यांच्यावर आधीपासूनच अनेक तक्रारी असल्याचे समजते.त्यांच्यावर वृक्षतोड रोखण्यात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी केली आहे.

       वनविभागात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आणि निष्क्रियता पाहायला मिळते.झाडे तोडली जात असताना दुर्लक्ष करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.नाहीतर वृक्षतोडीचा हा सुळसुळाट थांबणार नाही.

****

सरकार आणि प्रशासनाने लक्ष द्यावे…

       एका झाडाची वाढ होण्यासाठी अनेक वर्षे लागतात,मात्र काही तासांत त्याची कत्तल केली जाते.या परिस्थितीकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकार थांबवावेत आणि वृक्षतोडीच्या मुळाशी जाऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी,असेच अवैध वृक्षतोड घटनाक्रम सांगतो आहे.

      भिसी येथे घडलेली ही घटना म्हणजे पर्यावरण रक्षणाचा आणि पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे.वनपाल संतोष औतकार यांच्यासारखे अधिकारी जर वृक्षतोड करणाऱ्यांना पाठीशी घालत असतील,तर ही गंभीर बाब आहे.

       त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि वृक्षतोड थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.