प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत मौजा हेट्टी (दाबका) येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब उघडकीस आली आहे.या संदर्भात कोटगाव ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव पारित करण्यात आला आहे,ज्यामध्ये उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूरच्या दुर्लक्षाबद्दल चर्चा करण्यात आली आणि सदर सभागृहाचे बांधकाम पाडण्यात यावे असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
*****
बांधकामाची गुणवत्ता…
हेट्टी येथील सभागृहाचे बांधकाम सुरू असताना,पायव्यावर आणि स्लाॅबवर पाणी न टाकल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सभागृह बांधकाम गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
सभागृह बांधकामाच्या कामात वापरण्यात आलेल्या साहित्याची गुणवत्ता अत्यंत कमी असल्याचे आणि सभागृह पायव्यावर आणि स्लाॅबवर नियमानुसार पाणी टाकण्यात आले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
ज्यामुळे भविष्यात लवकरच सभागृह इमारतीला तळे जातील आणि सभागृह लवकरच पडेल याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
*****
ग्रामपंचायतीची भूमिका..
कोटगाव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या मुद्द्यावर चर्चा झाली.ग्रामपंचायतीने ठराव पारित करून बांधकाम विभागाला या समस्येवर लक्ष देण्यास सांगितले आहे.
ठरावानुसार,जर सभागृहाचे बांधकामच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नाही,तर संबंधित अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्यासंबधाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्याचा विचार केला जाईल असेही मासिक सभेमध्ये ठरविण्यात आले आहे.
*****
स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया…
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की,उच्च दर्जाचे बांधकाम आवश्यक आहे.कारण हे सभागृह त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचे ठरते.
त्यांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आणि आशा व्यक्त केली की संबंधित बांधकाम विभाग ठेकेदारावर आणि संबंधित अभियंत्यावर तात्काळ कार्यवाही करेल.
*****
निष्कर्ष…
हेट्टी (दाबका) येथील सभागृहाच्या बांधकामाची गुणवत्ता व त्याबद्दलची चिंता स्थानिक समुदायासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.
ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना आशा आहे की त्यांच्या समस्यांचे समाधान चिमूर सार्वजनिक उपविभाग बांधकाम कार्यालयाचे प्रभारी उपविभागीय अभियंता लवकरच करतील.
सदर सभागृहाचे बांधकाम २५/१५ जिल्हा निधी अंतर्गत असून ठेकेदार शेंडे हे नागपूरचे रहिवासी आहेत.त्यांनी सभागृहाचे बांधकाम नियमानुसार केले नसल्याने त्यांना काळ्या यादीत टाकावे असेही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.