दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
शेतातील गोठ्यात बैल बांधून असताना रात्रोच्या वेळेस गोठ्यात घुसून वाघाने बैलाला ठार केल्याची घटना खापरी (धर्मू) येथील शेतशिवारातंर्गत खापरी ते जांभुळघाट मार्गाजवळ समोर आली.
श्री.कृष्णा शिवराम मेश्राम हे सकाळी ७ वाजता गोठ्यात बांधलेले बैल बाहेर बांधण्यासाठी व गोठ्यातील शेण काढण्यासाठी गेले असता त्यांना वाघाने बैलाला ठार केल्याचे दिसून आले.
गोठ्यापासून काही अंतरावर वाघाने बैलाला ओढत नेऊन त्याचा मागील भाग खाल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी लक्षात आले.शेतकरी श्री.कृष्णा मेश्राम यांचा औताचा बैल वाघाने मारल्याने त्यांच्यावर अनावधानाने संकट ओढावले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून स्थळपंचनामा करावा व संबंधित बैल मालकाला लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्यावी,अशा प्रकारची मागणी माजी सरपंच तथा समाजसेवक प्रकाश मेश्राम यांनी केली आहे.
चिमूर तालुक्यातंर्गत जिकडे तिकडे वाघाची दहशत असून त्या हल्लेखोर वाघावर नियंत्रण आणणे वनविभागाला अजून पर्यंत जमले नाही.