घातपात करणाऱ्या सतिश जाधवला १२ तासांच्या आत अटक करा.. — सर्व रेती व मुरुम चोर माफियांवर कारवाई करावी..‌ — डॉ.सतिश वारजूकरांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी चिमूर,उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर,ठाणेदार चिमूर यांना काँग्रेस पक्षाद्वारे गंभीर मजकूरांचे निवेदन.. — नवनियुक्त ठाणेदारांच्या भुमिकेवर व कार्यशैलिवर संसय.. — आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडियांवर गंभीर आरोप.. — दंगा पथक दाखल..

प्रदीप रामटेके

 मुख्य संपादक

         कंत्राटदार तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी,माजी नगरसेवक विनोद ढाकुणकर यांच्या घातपात अपघाताला २२ तास उलटल्यानंतर सुध्दा घातपात घडवून आणणाऱ्या भाजपा पक्ष कार्यकर्ता असलेल्या सतिश जाधवांना अटक केली नाही आणि अपघात घडवून आणणारी इनोव्हा चारचाकी वाहन जप्त केले नाही.

          यामुळे समाजसेवक विनोद ढाकुणकर यांच्या घातपात अपघाताला अनुसरून महाराष्ट्र राज्य काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा माजी चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांच्या नेतृत्वात,चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव,चिमूर ठाणेदार योगेश घारे यांना काॅग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आज भेटले व घटनाक्रमाची सविस्तर माहिती देत निवेदन दिले.

          निवेदन देताना स्पष्ट केले की,१२ तासांच्या आत आरोपी सतिश जाधवांना अटक करावी व त्यांच्या मालकीची इनोव्हा कार जप्त करावी.पोलिस प्रशासनाने निवेदनाला गांभिर्याने न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा गर्भरित इशारा काँग्रेस शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक योगेश घारे यांना दिला.

            याचबरोबर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे व चिमूरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी,”दिनदहाडे व रात्रोच्या वेळेस खुल्लमखुल्ला वाळू व मुरुमाचे अवैध उत्खनन करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर,कार्यकर्त्यांवर फौजदारी कारवाई सह इतर कारवाई करावी याबाबत मागणी लावून धरली.

***

आमदारावर आरोप..

          आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया हे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रलोभने दाखवून दबाव टाकतात.पक्ष प्रवेशाच्या बाबत यश आले नाही तर वेगवेगळ्या पध्दतीने धमक्या देतात,त्यातलाच हा घातपात असून अपघात नाही असी शंका निवेदनात व्यक्त केली आहे.

      एवढेच नव्हे तर या घातपात घटनेमुळे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले असून पुढचा घातपात कोणत्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा,कार्यकर्त्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा होईल याचा नेम राहिलेला नाही.यामुळे सतिश जाधवांची कसून चौकशी केली जावी अशी मागणी रेटून धरण्यात आली आहे.

 

***

सतिश जाधवांना चिमूर पोलिसांनी अटक का म्हणून केली नाही?

         चिमूर नगरपरिषदचे माजी नगरसेवक तथा भाजपा कार्यकर्ता सतिश जाधव यांनीच कंत्राटदार तथा काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विनोद ढाकुणकर यांचा घातपातातंर्गत अपघात घडवून आणल्याची वार्ता झपाट्याने चिमूर शहरासह महाराष्ट्र राज्यात पसरली असताना,”चिमूर पोलिसांना अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तींची व अपघातग्रस्त चारचाकी वाहनाची भनक लागत नाही याला काय म्हणावे?

               चिमूरचे नवनियुक्त ठाणेदार योगेश घारे हे आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांचे विश्वसनीय असल्याचे समोर आले असून त्यांनीच त्यांना नागभिड पोलिस ठाण्यातून चिमूरला आणल्याची लोक चर्चा आहे.

          कालच्या घातपात घटनाक्रमाला अनुसरून तात्काळ योग्य तपासाची चक्रे न फिरविणाऱ्या ठाणेदार योगेश घारे यांच्यावर सध्यातरी अनेक प्रकारचे संसय बळावले असून असून,आमदार बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांनीच,”त्यांना,आपल्या कार्यकर्त्यांना व रेती आणि मूरुम चोर माफियांना वाचवण्यासाठी चिमूर पोलिस स्टेशनला आणले आहे? या प्रकरची लोकचर्चा खरी ठरु नये…

          म्हणूनच चिमूर ठाणेदार योगेश घारे यांनी विनोद ढाकुणकर यांचा घातपात घडवून आणणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करावी ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाची मागणी न्यायार्थ आहे असे समजावे लागेल.

          निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात डॉ.सतिश वारजूकर,कांग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र पदाधिकारी प्रा.राम राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी गजानन बुटके,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय पाटील गांवडे,चिमूर पसचे माजी उपसभापती रोशन ढोक,सुधीर चौधरी,चिमूर शहर अध्यक्ष अविनाश अगळे,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

***

पत्रकार परिषद..

             उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव, ठाणेदार योगेश घारे यांना निवेदन दिल्यानंतर चिमूर तालुका काँग्रेस पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

       या पत्रकार परिषदेत डॉ.सतिश वारजूकर,श्री.गजानन बुटके यांनी कालच्या घातपात घटनाक्रमाला अनुसरून पत्रकारांना सविस्तर माहिती दिली व आरोपांच्या फैरी झाडत सविस्तर व सखोल चौकशीची मागणी केली.

         तद्वतच १२ तासाच्या आत सतिश जाधवांना अटक करावी आणि वाळू आणि मूरुम चोर माफियांवर फौजदारी सह इतर प्रकारची कारवाई करावी या प्रमुख मागण्यावर भर दिला.

        निवेदन देताना व पत्रकार परिषदे घेताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर,काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र पदाधिकारी प्रा.राम राऊत,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी गजानन बुटके,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,माजी उपसभापती रोशन ढोक,शहर अध्यक्ष अविनाश अगळे,तालुका महासचिव विलास मोहिणकर,नागेंद्र चट्टे,जावा शेख,मंगेश घ्यार,विलास पिसे,प्रमोद दाभेकर,उमेश हिंगे,माजी सरपंच सविताताई चौधरी,गिताताई रानडेसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

****

चिमूरात दंगा पथक दाखल…

            कंत्राटदार तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी विनोद ढाकुणकर यांच्या घातपात प्रकरणी घटनाक्रमाला अनुसरून परिस्थिती चिघळायला नको म्हणून चिमूरात दंगा पथककाला पाचारण करण्यात आले आहे.

               मात्र,आरोपीला संरक्षण देताना चिमूरात व तालुक्यातील ग्रामीण भागात परिस्थिती चिघळायला पोलिस प्रशासन जबाबदार ठरु नये असेही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे…