प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या २५ व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हे या पुरस्कार सोहळ्याचे पाचवे वर्ष आहे. स्वयंदीप सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ.बबन जोगदंड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम दुबईमध्ये होत असतो.
यावर्षी दुबई येथील टावर प्लाझा या पंचतारांकित हॉटेलमध्ये जीवनगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम स्वयंदीप सोशल फाउंडेशन व लिवन्सा प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बहर अल मर्जन पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेख जासिम व मोहम्मद ओमर बिन हैदर होल्डिंग ग्रुप बीएससीचे सल्लागार अब्दुल्ला अहमद, टी कॉफी असोसिएशनचे चेअरमन प्रमोद वाकोडे, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ.बबन जोगदंड,, मुंबई येथील नामवंत प्रशिक्षक विनोद मेस्त्री यांची उपस्थिती होती.
यावर्षी या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 25 जणांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये नागपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रेवतकुमार बोरकर, शालिनी बोरकर,मंत्रालयातील माजी सहसचिव दिलीप प्रक्षाळे, शैलजा प्रक्षाळे, जालना येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उद्योजक देविदास बोंडे,तृष्णा मस्के, इन्शुरन्स कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी मारुती धतुरे, सुमन धुतुरे, पुण्यातील उद्योजक लक्ष्मण बालवडकर,इन्शुरन्स कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर सोनसळे, एअर इंडियातील सेवानिवृत्त सिनियर मॅनेजर मंगला , सातारा जिल्हा परिषदेतील सेवानिवृत अधिकारी नलिनी कोळी, उद्योजक राजेश रावत, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी पुष्पा कृष्णकुमार, विमला कुट्टन,उद्योजक शांताराम भोंडवे, ओमकार पैलवान, कार्तिक आय टी मधील अभियंता अनुपा नायर, गरवारे महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ.गौतमी पवार, महिला व बाल विकास विभागातील उत्तम खंदारे, ग्राफिक डिझाईनर गणेश भवार, मुंबई येथील प्रसिद्ध व्याख्याते विनोद मेस्त्री यांचा समावेश होता.
या सर्वांचा दुबईमध्ये या पुरस्काराने गौरव झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.