दिक्षा मॅडम म्हणजे जबाबदेही समजदार व्यक्तीमत्व…   — मॅडमच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द…

           दखल न्यूज भारतच्या मुख्य कार्यकारी तथा वृत्त संपादीका आ.दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे मॅडम यांचा आज वाढदिवस…

         त्या जबाबदार, जबाबदेही, समजदार, कर्तव्यदक्ष, संवेदनशील,कर्तव्यक्षम आणि आत्मविश्वासी आहेत..

        कठीणातल्या कठीण व विपरीत परिस्थितीत अतिशय कुशलतेने कार्य करणे व जबाबदारीपुर्वक कर्तव्य पार पाडणे हा त्यांच्यातील आदम्यविश्वास अमुल्य आहे..

             मी अनुभलोय,माझ्यावर कठीण परिस्थिती व वेळ असताना आणि माझ्या बदनामीचा काळ सुरू असताना,—“त्यांना,— दखल न्यूज भारतच्या बातम्या प्रकाशित करु नये यासाठी दबाव येत होता आणि अयोग्य शब्दांची त्यांच्या सोबत ट्रीटमेंट होत होती.मात्र न डगमगता,”त्यांनी,दखल न्यूज भारतला सोडले नाही आणि बातम्या प्रकाशित करणेही थांबविले नाही..

         त्यांच्यातील आत्मविश्वास, आत्मबल, आत्मधैर्यता, आत्मनिर्भरता, त्या प्रसंगी मला अनुभता आली..

           याचबरोबर माझ्याबाबतीत विश्वास गमावल्याच्या चर्चा वारंवार कानावर पडायच्या अशा वेळी “त्यांनी,”दखल न्यूज भारतची, साथ न सोडणे यातच त्यांच्या कार्याची व कर्तृत्वाची कुशलता लक्षात येते.

          तद्वतच माझ्या संकट व आरोग्य काळात संपर्क ठेवायला जवळचे व दुरचे घाबरायचे,”अशा वेळी मला साथ देणे व सहकार्य करणे म्हणजे,”पुण्य कर्माची त्यांना अमुल्य देण आहे,असे मी समजतो..

              “मला दिलेला सहकार्याचा आधार मी विसरु शकत नाही…

         सर्व विपरीत परिस्थितीत कर्तव्य पार पाडणाऱ्या आणि कुशलतेने जबाबदारी सांभाळणाऱ्या,कर्तव्यदक्ष…

    “दिक्षा मॅडमला,…

         सहृदय तथा आभाळभर खूप खूप मनपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा!..

      त्या सदैव सुखी व समाधानी रहावे हिच मनस्वी सदिच्छा…

***

म्हणूनच…

      “उजळल्या पंती प्रकाश जाणवू कुठे?,”प्रकाशमय असलेल्या दिशांचा मार्ग शोधू कुठे?…

**

              शुभेच्छूक

                प्रदीप रामटेके

                प्रबंधक मुख्य संपादक

                दखल न्यूज भारत वेब पोर्टल..