लेक लाडकी समूह नृत्य स्पर्धेत जानकीबाई बजरंगसिंह चंदेल कला महाविद्यालयांने पटकावला द्वितीय क्रमांक….

      राकेश चव्हाण

 कुरखेडा तालुका प्रतिनिधी  

           नुकतेच पार पडलेल्या “बेटी बचाओ बेटी पढाओ “या योजने अंतर्गत महिला बाल विकास विभाग एकात्मीक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय कुरखेडा ने आयोजित केलेल्या लेक लाडकी समूह नृत्य स्पर्धेत जानकीबाई बजरंगसिंह चंदेल कला महाविद्यालयां ने द्वितीय क्रमांक पटकावला.

          या स्पर्धेत एकेविस विद्यालयाने सहभाग नोंदकवीला होता.ट्राफी सह एक हजार पाचशे रुपयांचं पारितोषिक प्राप्त करीत मुलींनी विद्यालयाला यश प्राप्त करून दिला.

            या प्रसंगी उपस्थित बीडीओ पाटील, सीडीपीओ कुकडे व ईतर उपस्थितांकडुन ही’ शेतकर्याची आत्महत्या’ या नृत्याला सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर रोख बक्षीसे देण्यात आली.

              विद्यार्थानी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य उमा चंदेल, प्रा.हिवराज सुखदेवे, प्रा.लुकेश फुलबांधे, प्रा.बावनथडे, राकेश सहारे, बाबुराव तुलावी यांना दिले.कार्यक्रमा प्रसंगी विविध विद्यालया तील विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती होती.