निरा नरसिंहपुर दिनांक 5
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
आम्ही भाजपचे निष्ठावंत ग्रा. पं. सदस्य असून, कायम भाजपसोबत राहणार आहोत. हर्षवर्धन पाटील हेच आमचे नेते असून, आम्ही कालही भाजपमध्ये होतो व आजही भाजपमध्ये आहोत, असा स्पष्ट निर्वाळा दगडवाडी ग्रामपंचायतीमधील 9 पैकी 6 सदस्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापूर येथे शनिवारी (दि.4) भेट घेऊन दिला. त्यामुळे दगडवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा बार फुसका निघाला आहे.
दगडवाडी येथे नुकत्याच झालेल्या पेयजल योजनेच्या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा बातम्या मोठा गाजावाजा करून देण्यात आल्या होत्या. सदर बातम्यांचे खंडन करून दगडवाडी ग्रामपंचायतीच्या 6 सदस्यांनी आम्ही भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचा निर्वाळा हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन दिला. इंदापूर तालुक्याच्या आज जो विकास दिसत आहे तो हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. तालुक्याच्या विकासाची दूरदृष्टी व क्षमता फक्त हर्षवर्धन पाटील यांच्याकडेच असल्याचे या सदस्यांनी नमूद केले. यावेळी या सदस्यांनी दगडवाडी कार्यक्रमात प्रवेशाची खोटी घोषणा कशी करण्यात आली हे हर्षवर्धन पाटील यांना सांगितले. यावेळी दगडवाडी ग्रामपंचायतीचे भाजपचे उपसरपंच दत्तात्रय पोळ, ग्रा. पं. सदस्य रामदास रासकर, सुशीला रासकर, भाग्यश्री कुदळे, स्वाती पारेकर, किसन मोटे हे 6 सदस्य उपस्थित होते. तसेच सचिन सहदेव रासकर, संदीप गायकवाड, तानाजी रासकर, मनोज निंबाळकर, राजू सूळ, सुनील कचरे, रमेश दुधाळ आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.