कमलसिंह यादव
प्रतिनिधी
कन्हान:-कन्हान येथे तलवारीसह भरबाजारात धुमाकूळ शुक्रवारी युवकांनी घातला होता. या गंभीर घटनेची पोलिस अधिक्षक विशाल आनंद यानी दखल घेत कन्हाने ठाणेदार विलास दशरथ काळे तथा उपविभागीय पोलिस अधिकारी भ्रष्ट असल्याचा आरोप नागरिका,नेतागण व पत्रकारांनी केला होता.
याची दखल घेत पोलिस निरीक्षक विलाश दशरथ काळे यांची नियंत्रण कक्षात नागपुर ग्रामिण येथे तत्काळ बदली केली. कन्हान पोलिस स्टेशनला त्यांच्या जागी रामटेक वरुन बदलून आलेले पो. नि. प्रमोद केशवराव मकेश्वर रूजू झाले आहेत.
रामटेक येथे त्यांच्या जागी पोलिस निरीक्षकपदी एच. एन. यादव हे रूजू झाले असून,त्यांनी नुकताच कार्यभार सांभाळलेला आहे.
नव नियुक्त पो.नि.मकेश्वर यापुर्वी पारशिवनी खापरखेडा नागपुर व त्यानंतर रामटेक येथे कार्यरत होते..