छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री. साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 4 फेब्रुवारी रोज शनिवारला बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश गोगूलवार संचालक आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केशव गुरनूले सृष्टी संस्था एरंडी, प्राचार्य जीभकाटे सर व लाखे मॅडम उपस्थित होते .सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जीभकाटे सर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय अध्यापनाबरोबरच सहशालेय उपक्रमाची किती गरज आहे हे स्पष्ट करून सांगितले. त्यानंतर केशव गुरनुले सर यांनी नदीचे महत्त्व समजून सांगितले. यानंतर बक्षीस वितरणाला सुरुवात झाली यामध्ये कबड्डी, गोळाफेक, लांब उडी व दौड स्पर्धा येथील विजेत्यांना व उपविजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तम कामगिरीसाठी कुंदन साखरे, वैष्णवी निकुरे या विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले. तसेच आमच्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेकडून निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना सुद्धा बक्षीस प्रदान करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणातून डॉ. गोगुलवार सर यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. शेवटी जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निकुरे सर, करमरकर सर, वैद्य सर, साळवे सर, नैताम सर ,वाघे सर, निंबेकार सर इत्यादींनी मोलाचे कार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन छन्ना खोब्रागडे सर तर आभार साळवे सर यांनी व्यक्त केले.