![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
गजानन महाराजांच्या पालखीसह भिसी येथून ३ जानेवारीला दुपारी १२ वाजता वारकऱ्यांचे शेगावकडे प्रस्थान झाली.चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ.सतिश वारजुकर पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
चिमूर तालुक्यातील भिसी येथून श्री.संत गजानन महाराजांची पालखी घेऊन ३ जानेवारीला दुपारी १२ वाजता ४१ वारकरी पायदळ वारी काढत शेगावकडे रवाना झाले.
श्री.संत गजानन माऊली भक्त मंडळ भिसीच्या वतीने या पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी श्री. विठ्ठल- रुखमाई देवस्थान स्थित गजानन महाराज यांचे मंदिरातून सकाळी नऊ वाजता विधिवत पूजा,आरती व धार्मिक विधी पार पाडून वारकऱ्यांची भजन दिंडीसह मिरवणूक गावातून निघाली.
ही मिरवणूक जुनी ग्रामपंचायत चौक,अहिल्यादेवी होळकर चौक,ठोंबरे मोहल्ला चौक,महात्मा गांधीं चौक,जय अम्बे चौक,भट्टी चौक,राजमाता आखर चौक,समता दुर्गा चौक, पोलीस स्टेशन जयस्तंभ चौक,मस्जिद चौक,महात्मा फुले चाळ,शनिवार पेठ चौक,हनुमान व्यायाम मंडळ ढिवरपुरा चौक, श्री.राममंदिर जुनी ग्रामपंचायत चौक,हनुमान व्यायाम मंडळ खातीपुरा,अशी गावभरातून काढण्यात आली.
शेवटी वाढोणा मार्गे शेगावच्या दिशेने वारकऱ्यांनी प्रस्थान केले.या पालखी मध्ये चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ.सतिश वारजुकर यांनी उपस्थिती दर्शवली.या सोबतच जिल्हा काँग्रेस महासचिव सचिन गाडीवार,माजी उपसभापती रोशन ढोक,माजी पं.स.सदस्य प्रदीप कामडी,प्रा.विजय घरत,मधुकर मुंगले,मनोज दिघोरे,शुभम गिरडे उपस्थित होते.