मुरूमगाव येथे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

         येथील सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा क्षयरोग केंद्र गडचिरोली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी रोज शुक्रवारला स्व. रामचंद्रजी दखणे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात आला.

          जिल्हा क्षयरोग केंद्र गडचिरोली अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव मार्फत ७ डिसेंबर ते २४ मार्च दरम्यान १00 दिवस कालावधीत ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी क्षयरोग मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे.

         यासाठी गावातून शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढून ” टी. बी हरेल, “देश जिंकेल,जनसेवेचे कार्य महान ,१०० दिवसात टी. बी. मुक्त भारत अभियान”अशा घोषणा देत जनजागृती केली.

           रॅलीचा समारोप दखणे विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.

           याप्रसंगी डॉ.राहुल बनसोड, डॉ. घुगे, डॉ. सलगर आदींनी क्षयरोग होण्याची कारणे, परिणाम व त्यावरील उपाययोजना बाबत माहिती दिली.

           कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस प्रभारी अधिकारी मिथुन शिरसाट, संस्था अध्यक्ष कमलाबाई दखणे, मुख्याध्यापक महेंद्र जांभूळकर, पी. एस. आय.सचिन ठेंग, गणेश कापगते, हर्शिद हालधर, मेजर उसेंडी, मेजर कळमकर, बी. जे. मेश्राम, एस.जी . सुरनकर , जी. जे चिंचोलकर, बी. जे बोरकर आदी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राहुल बंसोड, यांनी केले.

        संचालन ए.एन. एम.साक्षी कोकोडे यांनी केले तर आभार निमा चापले यांनी मानले.

         कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.