![](https://www.dakhalnewsbharat.com/wp-content/uploads/2023/11/photo_2023-11-16_09-08-22.jpg)
रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील नेरी येथील माळी समाजाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मोमबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करून मालार्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्त क्रांतीज्योती सावित्री माईच्या प्रतिमेचे दाम्पत्यासह फुले दाम्पत्यासह भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीमध्ये विलास राऊत सौ.अश्विनी राऊत यांनी महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिकृती वेशभूषा मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले होते.
मिरवणुकीमध्ये समस्त माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरवणुकीनंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेचे अध्यक्षस्थानी संजयराव डोंगरे माजी अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून रामदासजी सहारे माजी सरपंच, प्रभाकर लोथे सर, बद्रीनाथ देसाई ,लालाजी शेंडे, बाळूभाऊ बोभाटे, संजय साखरकर सौ अर्चनाताई डोंगरे, सौ ललिताताई कडूकार, सौ प्रतिभा गेजीक, विजय कडुकार, वसंता कामडी, किशोर उपरकार, भारत राऊत, राजीव पडवेकर हे होते.
यावेळी मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकीत सावित्रीबाई फुले केवळ आद्यशिक्षीकाशिवाय त्या समाज शिक्षीका होत्या असे संबोधीत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिताताई कडूकार यांनी केले संचालन पांडुरंग मेश्राम सर यांनी केले आभार नितेश कामडी यांनी मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता नेरी,सरडपार,उसेगाव येथील समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य लाभले.