आजाद समाज पार्टी ( कांशीराम ) द्वारे दिल्या गेली ज्ञानज्योती सावित्रीमातेस व शहीद विरांना मानवंदना… — समता सैनिक दल व भिम आर्मी पदाधिकाऱ्यांचा सहभाग…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

      क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून भिमा कोरेगांव येथील शहीद विरांना मानवंदना देणारा व सावित्री मातेस अभिवादन करणारा कार्यक्रम आजाद समाज पार्टी (कांशीराम ) चिमूर तालुका,समता सैनिक दल,भिमआर्मी (भारत एकता मिशन) मालेवाडा,यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बि.पी.एड. ग्राऊडवर पार पडला. 

        यावेळी प्रतिकात्मक भव्य विजयस्तंभाला समता सैनीक दलाने सलामी देत मानवंदना दिली.

         यावेळी मंचावर भदंत प्रज्ञाशील,मुख्य आयोजक अमित भिमटे,प्रा.डॉ.चंद्रभान खंगार,समता सैनिक दलाचे मार्शल सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.

        दुसऱ्या सत्रात सायंकाळी समाज प्रबोधनात्मक संगीतमय श्रध्दांजलीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

     यामध्ये प्रसिद्ध गायिका सुषमा देवी,गायक सुमीत भिमटे, गायक विजय पारखी यांनी गित गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

       १ जानेवारी १८१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे पेशवाई विरुद्ध झालेल्या लढाईत महार रेजीमेंटने आपल्या शौर्याचा परिचय देत समता,स्वातंत्र,बंधुता व न्याय या मुल्यांचे रक्षण केले होते. 

        या दिवसाची आठवण नवीन पिढीला व्हावी व सदर मुल्ये समाजात रुजावी याकरीता सदर कार्यक्रमाचे नियमीत आयोजन केले जाईल असे मुख्य आयोजक अमीत भिमटे तालुका अध्यक्ष आजाद समाज पार्टी ( कांशीराम ) यांनी सांगीतले.

              कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी जनता व समतामुलक विचारक उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी अमीत भिमटे,अजय गजभिये,शुभम गजभिये,निखिल रामटेके,सुमित गजभिये,अंकित दहिवले,सागर बोरकर,दीक्षांत शेंडे,टिनू गजभिये,वेदांत गजभिये,आर्यन मेश्राम,चिराग मेश्राम यांनी परिश्रम घेतले.