मुनघाटे महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सावित्रीमाई फुले दिन…  — शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगावी :- प्राचार्य डॉ.उदय थुल…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

        श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे 3 जानेवारीला महाविद्यालयात सावित्रीमाई फुले जयंती मोठ्या उत्साहात पार पडला.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल हे होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉ. विना जंबेवार मॅडम,वटक मॅडम, गीताचंद्र भैसारे मॅडम, डॉ. प्रियंका पठाडे मॅडम, खोब्रागडे मॅडम, श्रीमती चंदेल मॅडम, लीना तुमराम रितिका भेंडारे,कोमल मोहुंरले हे व्यासपीठावर उपस्थित होते.

         या कार्यक्रमाची सुरुवात धानोरा येथे प्रभात फेरी काढून सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात प्राचार्य डॉ.उदय थुल यांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.

           सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका गीताचंद्र भैसारे मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.सावित्रीमाई फुले यांच्यावर आधारीत भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

         यामध्ये आरती वाढई प्रवीलीता मोहुरले धूप मोहुरले कुमारो पोटावी श्वेता मोहुरले गायत्री बारसागडे रोहिणी मांदळे या विद्यार्थिनी सहभाग घेतला तसेच एकल नाट्य प्रयोग सादर करण्यात आले.

        या एकल नाट्य मध्ये वंदना कोरच्या सोनाली हलमी हिने सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषा मध्ये एकपात्री प्रयोग सादर केला आणि पौर्णिमा मडावी सोनाली हलामी यांनी सावित्रीमाई फुले यांच्यावर गीत गाण्यात आले.

          प्राचार्य डॉ.उदय थुल यांनी सावित्रीमाई यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांनो सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन शिक्षणाप्रती जिद्द विद्यार्थ्यांनी नेहमी ठेवावी. समाज जागृत करण्यासाठी स्वतः त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले सावित्रीमाईंनी केलेले कार्य पुढे नेण्याचे कार्य आपल्यावर आहे.विद्या घेण्याची भूक शमली नाही पाहिजे असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

          तसेच खरा शिक्षक दिन सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवसा दिनापासून करण्यात यावा असेही मत त्यांनी यावेळेस व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे संचालन प्रा. भाविकदास करमनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.प्रशांत वाळके सर यांनी केले धानोरा पोलीस स्टेशनचे प्रशांत जंगले एपीआय संतोष मलगाम पो. ह. यांनी विद्यार्थ्यांच्या रॅलीस सहकार्य कले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.