महाराष्ट्रातील महायुतीने असे कोणते काम केले?  — जेणेकरून 288 पैकी 232 आमदार निवडून आले..

           महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या राज्य सरकारने विधानसभा निवडणूकपुर्व लोक विरोधी धोरणे राबविली व लोक विरोधी निर्णय घेतले,नौकर भरतीत कंत्राटदार कार्यपद्धत सुरु केली,राज्यातील ६२ हजार प्राथमिक शाळा बंद केल्यात, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही असे असताना २८८ पैकी २३२ जागवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय पचनी न पडणारा आहे.

     उदाहरणार्थ…

      1) 62,000 शासकीय शाळा बंद करण्याचे आदेश दिले म्हणून….

      2) 7 लाख कोटी रुपये कर्जावरून महाराष्ट्र 10 लाख कोटीवर नेऊन ठेवला म्हणून…..

      3) महाराष्ट्रात येणाऱ्या आणि आलेल्या महत्वाच्या गुंतवणूकीच्या कंपन्या गुजरातला पळवल्या म्हणून..,..

       4) स्वाभिमानी उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटांच्या आमदारांना फोडून ई. डी. CBI च्या माकडाकरवी कोलान्ट उड्या मारायला लावल्या म्हणून…

       5) लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे जरा जास्तच EVM मध्ये एक्स्पर्ट कडून सेटिंग केले म्हणून….

        6) लाडक्या बहिणीकडून 7500 /- रुपयात मत विकत घेतले ( लगेचच 100 /- बॉण्ड 500/- ला केला आणि 100/- ची सोयाबीन तेलाची बॅग 135 /- केली ) म्हणून….

     7) मागासवर्गीयांच्या स्कॉलरशिपचा निधी इतरात्र वळवला म्हणून…..

     8) छत्रपती शिवरायांचा पुतळा 4 महिन्यात भ्रष्टाचारमुळे पडला म्हणून….

      9) बदलापूरच्या प्रकरणातील आरोपीला खोट्या एनकाउंटरमध्ये मारले म्हणून…..

     10) काय ते हॉटेल, काय ते डोंगर,काय ती झाडी म्हणत सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन पळपुट्या मावळ्यांची फौंज निर्माण अलीबाबाने 40 चोरांची 50 खोके सर्व ओकेची निर्मिती महाराष्ट्रीयन जनतेला कर्जात बुडवले म्हणून…….

     11) एका खोटारड्या प्रधानमंत्र्याने आणि एका खुनी तडीपाराने दडपशाही निर्माण केली म्हणून…

नव्हेच…….

      तर तुम्ही ( मोदी – शहा ) गुजरातमधील कंपनीतून निर्माण झालेल्या EVM मधील कंट्रोलिंग चिपला एक्स्पर्ट कडून सेटिंग केल्यामुळेच तुम्ही 232 वर पोहोचलात..

    तसे नसेल तर मार्कडवाडी गावात कर्फ्यू का लावली?

     का त्यांना बॅलेट पेपरवर मतदानाचा प्रयोग करू दिला नाही?

हा पुरोगामी महाराष्ट्र आहे..

      छ.शिवाजी महाराज,म. फुले,छ.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे….

       इथे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या भटोड्याचे सर कलम करताना मागेपुढे न पाहणारे छ. शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे होऊन गेलेत.

     इथे वेदोक्त प्रकरणात विश्वासघात झाला म्हणून छ.. शाहू राजांनी त्याला शिक्षा केलीच……

    ब्राम्हणांच्या मंगलाष्टकांना म.फुले यांनी सत्यशोधक पद्धतीने पर्याय दिला…..

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ब्राम्हण मनूने निर्माण केलेल्या मनुस्मृतीला अग्निच लावून राख करुन टाकली…..

     वरील सर्व ऐतिहासिक क्रांतीचा सूड उगविन्यासाठीच प्रतीक्रांतीची भेकड लाट EVM मधून निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय….

तो प्रयत्न…..

     हाच पुरोगामी महाराष्ट्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही……

     त्याची सुरुवात नांदेड आणि औरंगाबाद मधील EVM हटाव धरणे आंदोलनाने सुरुवात झालेली आहे.

****

जागृतीचा कृतिशील लेखक आणि आवाहनकर्ता…

      अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर,7875452689