
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
सिंदेवाही तालुक्यातील खैरी (चक) येथे अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आयोजित अनावरण कार्यक्रमाला अनुसरून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला.
पुर्णाकृती शिल्पाचे अनावरण महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आमदार महोदयांसह उपस्थितांनी अभिवादन केले.
त्यांनी दिलेले शिक्षण,समता आणि स्वाभिमानाचे संदेश समाजासाठी प्रेरणादायी आहेत.माळी महासंघाने या कार्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच भावी पिढ्यांना प्रेरणा देईल हा विश्वास आहे असे प्रतिपादन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी अनावरण प्रसंगी केले.