ब्रेकिंग न्यूज…– चिमूर-कान्पा राष्ट्रीय माहामार्गातंर्गत जांभुळघाट ते मांगलगावचे मधात भिषण अपघात.. — दोघे गंभीर जखमी..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

        चिमूर – कान्पा राष्ट्रीय महामार्गातंर्गत जांभुळघाट ते मांगलगावचे मधात सायंकाळच्या सुमारास भिषण अपघात झाला असून अपघात कसा झाला व कोणी केला हे अजूनपर्यंत कळले नाही.

         अपघातग्रस्त दोन बाईकस्वारांना गंभीर मार लागला असून एकाला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ हलविण्यात आले तर सध्यास्थित एका अपघातग्रस्तांचा उपचार चिमूर उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे.

 

         भिसी पोलिस स्टेशनचे पिएसआय मुकेश ढोबळे यांच्यासी संपर्क केला असता त्यांनी बाईक पोलिस स्टेशनला जमा केल्याची माहिती दिली.

        मात्र सध्यास्थित अपघातग्रस्तांची नावे व ते कुठले रहीवासी आहेत याबाबत त्यांना सुध्दा माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

          अपघाताबाबत व अपघातग्रस्तांबाबत उद्याला सर्व माहिती मिळण्याची शक्यता आहे.