राजेंद्र रामटेके
ग्रामीण तालुका प्रतिनिधी
कुरखेडा...
कुरखेडा :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुरखेडा तर्फे संघटनात्मक आढावा बैठक रविन्द्रजी वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
ना.धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विस्तार करण्यासाठी तालुक्यात बुथ समिती गठित करणे,राष्ट्रवादी फ्रंटचे व सेलचे,युवती,आदिवासी आघाडी कार्यकारीणी तयार करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले.
यावेळी आढावा बैठकीत युनुसभाऊ शेख प्रदेश संघटक सचिव,केसरी पाटील उसेंडी माजी सभापती,योगेश नांदगाये जिल्हा उपाध्यक्ष,ज्ञानेश्वर पायघन जिल्हाध्यक्ष सेवादल,दिपक बैस जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया,रामभाऊ लांजेवार तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,मुन्ना शेख शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,राहूल घोगरे,युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,झुनुकलाल चौधरी,सनतलाल हिडको,मुरली दहीकर,राजू रामटेके,जगदीश सहारे,प्रशांत जोग,नितीन केरामी,भावेश सोनटक्के,दादाजी प्रधान,प्रभाकर जुमनाके,हेमराज शिवणकर,देवानंद दहिकर,चेतन दहीकर,देवानंद गिरडकर,प्रितम सुरनकर आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.