
कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी..
पारशिवनी:- मौजा पिपरी,ता. पारसिवनी,जिल्हा नागपूर येथे मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे आयोजन महिला लिडर सौ.ललिता ताई कुळमते,राजलक्ष्मी नारनवरे,पुष्पा पात्रे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमा प्रसंगी मानव विकास सेवा बहुउद्देशीय संस्थाचे संस्था प्रमुख शंकरभाऊ ईनवाते,प्रशांत मसार,संदीप परतें,सुरज वरखडे,शुभम उईके,राजु उईके,मंजु उईके,साधना तिवाडे,नलुबाई नारनवरे,कविता येलमुरे,मंगलाबाई मसराम,अनुकरणाके निर्मला पात्रे,संगीता उईके,प्रियंका कडनाके,साधना बाई भोयर,रोशनी पंधरे,वंदना तिवाडे,देवकाबाई कडनाके,प्रभाबाई उईके,भारती पासी,लक्ष्मीबाई कुडे,सुरेखा तिवाडे,निर्मला हाडके प्रामुख्याने उपस्थित होते.