प्रितम जनबंधु

संपादक 

 

 गडचिरोली :- 

तथागत भगवान बुद्धाचा धम्म हा सुखी व शांतीपूर्ण जीवन जगण्याचा उतम मार्ग आहे. तथागत बुद्ध पहिले नंतर धम्म म्हणुनच मी जगभर घराघरात बुद्ध पोहचविण्याचे काम करीत आहे. बुद्ध धम्माची ओळख ही स्वच्छ कपडे ‘ चमकदार बुद्ध विहार ‘यातूनच बौध्द धम्माचा प्रचार आणि प्रसार होवू शकतो अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन सिने कलाकार गगण मालिक यांनी भीमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव कार्यक्रमा प्रसंगी केले.

ऑल इंडिया शेड्युल्ड कॉस्ट्स फेडरेशन आयोजीत भीमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रम वैनगंगा नदीघाटावर गडचिरोली येथे शेकाफे चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर मुख्य मार्गदर्शक सिने अभिनेता तथा दानशुर गगण मलिक तसेच प्रमुख अतिथी म्हणुन रिपाई चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे, रिपाई नेते प्रा. मुनिश्वर बोरकर, माजी जि.प. सदस्य अँड. राम मेश्राम, गगण मलिक फॉऊडेशन चे नितिन गजभिये नागपूर, स्मिता वाकडे नागपूर, न. प. सावली च्या नगराध्यक्षा लताताई लाकडे, माजी जि. प. अध्यक्ष समय्या पसुला. सामाजीक कार्यकर्ते मोहन ठाकरे आदी लाभले होते. 

 

याप्रसंगी गगण मलिक पुढे म्हणाले की, माझा जन्म हिंदू धर्मात झाला. मी अभिनय क्षेत्रात अनेक भुमीका साखारल्या परतू श्रीलंकेतील निर्माण झालेल्या सिध्दार्थ गौतम या चित्रपटातील बुद्धाच्या साकारलेल्या भुमिकेने माझे जिवनच बुद्धमय झाले. मी १०० दिवश श्रामणेर भिख्खु बनलो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून मी आज बुद्ध धर्माच्या प्रचाराला लागलो आहे जेणेकरून जगभरातील बौद्धाना एकत्र जोडता येइल बाबासाहेबांचे कार्य पुढे नेता येइल. 

 

याप्रसंगी अँड. राम मेश्राम, नितिन गजभिये, गोपाल रायपूरे, प्रा.मुनिश्वर बोरकर, नगराध्यक्षा लताताई लाकडे, समय्या पसुला, स्मिता लाकडे आदीची समायोजीत भाषणे झालीत. 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप गोवर्धन यांनी केले. संचालन निमगडे यांनी तर आभार पंडित मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com