नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
साकोली : महिला राजकारणसोबतच अभिनयाच्या आवडीतून “झाशीची राणी” ओळख देऊन गेलेल्या स्व. गिताताई शरद कापगते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व त्यांच्या स्मरणार्थ महिलांनी “सोन्याची द्वारका अर्थात भक्त सुदामा” नाट्यप्रयोग ( ०३.जाने.) रा.०९ वा. सेंदूरवाफा – नगरपरीषद साकोली प्रांगणात सादर झाला. हा केवळ महिलाच पात्र अभिनय भुमिका नाट्यप्रयोग बघायला महिलांनी एकच गर्दी केली होती.
स्व. गिताताई कापगते स्मृति प्रित्यर्थ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, वनवासी बहुउद्देशीय संस्था, राणी लक्ष्मीबाई महिला मंडळ, गिताई फिटनेस क्लब व कापगते सर्व्हिस स्टेशन साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा ०३ अंकी नाट्यप्रयोग संपन्न झाला. येथे दिप प्रज्वलन करून मंचावर उदघाटक दिशा फाऊंडेशन अध्यक्षा सरीता फुंडे, कविता देशमुख बोनकट्टा ( म.प्र.), धनवंता राऊत, शकुंतला कापगते, इंद्रायणी कापगते, कल्पना बाळबुद्धे, कुंदा डोंगरवार, माहेश्वरी नेवारे, रेखा भाजीपाले, वनिता डोये, डॉ. छाया कापगते, सुनिता कापगते, जयश्री पर्वते, भुमाला उईके, दिपलता समरीत, मनिषा काशिवार, शारदा लांजेवार, अनुराधा काशिवार, राजश्री मुंगूलमारे, शैलू बोरकर, लता कापगते, रोहिणी मुंगूलमारे व अन्य हजर होते. महिलांचीच भुमिका असलेल्या हा नाट्यप्रयोग बघायला साकोली सेंदूरवाफासह उमरी, लवारी, पाथरी, परसोडी व परीसरातून हजारांच्या घरात महिला पुरूषांनी एकच गर्दी केली होती. मंचावरून वक्त्यांनी आपल्या भाषणात स्व. गिताताई कापगते यांना श्रद्धांजली देत त्यांनी केलेल्या महिला शक्ति, सर्वधर्म समभाव, व आपल्या झाशीची राणी भुमिकेतून अन्यायाविरूद्ध लढा देतांना कसा तरबेज व जिवंत अभिनय करून त्याची प्रचिती आजच्या तरूण मुलींवर पडेल असे अभिनयातून आपली वेगळी छाप पाडली असे वक्तव्य केले. या नाट्यप्रयोगासाठी दिग्दर्शक ललित खुणे, कैलाश लोथे, कुंदा कापगते, चैतराम झोडे, उद्धव कटकवार, योगेंद्र गौतम, संयोजक वैयजंती कापगते, गिता हातझाडे, शरद कापगते, तेजराम डोंगरवार, भालचंद्र हांडेकर, छगन पुस्तोडे, अरविंद कापगते, कल्पना कापगते, देवश्री कापगते, अंशिका कापगते, पदमा कापगते, डॉ. मोहिनी हांडेकर, संजय कापगते, डॉ. गजानन डोंगरवार, दामोधर कापगते, माणिक नाकाडे, बाळा कापगते, डॉ. ओमप्रकाश नाकाडे, अॅड.मनिष कापगते, सपन कापगते, डॉ. आलोक कापगते, चंद्रशेखर कापगते, देवदत्त हाडगे, रामू कापगते यांनी विशेष सहकार्य केले. येथे संचालन प्रा. गिता बोरकर यांनी केले. नाट्यप्रयोग संपताच राष्ट्रगिताने सांगता करण्यात आली.