चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
श्री.विजय ईश्वर राऊत मु.किन्ही(एकोडी) येथील रहिवासी आहेत.ते महावितरण कार्यालय सडक अर्जुनी येथे लाईनमन या पदावर कार्यरत होते.त्यांचे काल सायंकाळी अपघातातंर्गत दुःखद निधन झाले.
कोर्ट टिम साकोलीचे सदस्य श्री.दुधरामजी मानकर यांचे ते लहान साळे आहेत.विजय राऊत यांच्या दुःखद् निधनाने त्यांच्या परिवारात शोककळा पसरली आहे.
आज पोस्ट मार्टम नंतर अंतीम संस्कार मुळगावी किन्ही/एकोडी येथे अंदाजे १ ते २ वाजताच्या दरम्यान होईल असे कुटुंब सदस्यांनी कळविले आहे.
निसर्ग देवता त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करोत अशाप्रकारच्या भावना त्यांच्या परिवारातील सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.