प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील गांधी चौक जवळ असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने गावात दि. ०२ ते ०३ डिसें. रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
दि. ०२ डिसें. रोजी संध्याकाळी श्री गुरुदेव सेवा मंडळ येथे समितीच्या वतीने घटस्थापना करण्यात आली. दि. ०३ डिसें. रोजी सामूहिक प्रार्थना घेऊन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे गावात मिरवणूक काढण्यात आली आणि रात्रौ सहभोजनचा कार्यक्रम ठेवण्यात आला.
यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष महादेव दुमाने, सचिव मोरेश्वर पगाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, ग्रामपंचायत सदस्य सत्यदास आत्राम, आदेश आकरे, माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग बावनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आकरे, लीलाधर उपरे, रमेश पगाडे, विनोद फुलबांधे, नारायण धनकर, किशोर गेडाम, दिवटे टेलर्स, फुकट दुमाणे, सुनील गेडाम यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न घेतले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी गावातील तसेच परिसरातील बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले.