दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : राज्यपालांकडून महापुरुषांचा वारंवार अपमान करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या प्रवृत्तीची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख अशोकराव खांडेभराड यांनी आज आळंदी येथे केली.
राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार अवमानकारक वक्त्यव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावण्याचा काम केले आहे. कोश्यारी ही प्रवृत्ती असून या प्रवृत्तीला ठेचले पाहिजे.दिल्लीच्या बादशाहला खुश करण्यासाठी बेताल वक्तव्य करत असतील तर ते आम्ही सहन करणार नाही,कोश्यारी यांना त्वरीत हटवा नाहीतर अधिक तीव्र आंदोलन असा इशारा खांडेभराड यांनी दिला.
आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवसेना युवासेना आळंदी शहर शाखेच्या वतीने राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दाबद्दल तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी राज्यपाल कोश्यारी गो बॅक, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना खेड तालुका संपर्कप्रमुख अशोक खांडेभराड, उत्तम गोगावले,शिवसेना शहरप्रमुख अविनाश तापकीर,मा.नगरसेवक आनंदराव मुंगसे,रमेश गोगावले,शैला तापकीर,संदीप पगडे,तुषार नहार,शशिराजे जाधव,मंगेश तिताडे,बालाजी शिंदे,संगीता फफाळ,श्रीमती अनिता झुझम,उषा ननवरे,अनिता शिंदे,शुभंगी यादव,संतोषी पांडे,भरती वाघमारे,विजया विसपुरे,शारदा लांडे,निखिल तापकीर,आशिष गोगावले व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.