युवराज डोंगरे/खल्लार
रोहित्र संचामधिल(डीपी)ऑइल चोरुन नेताना अमरावती येथील दोन चोरट्यांना खल्लार पोलिसांनी 2 डिसेंबरला रात्री एक वाजता दिघी ते महिमापूर रोडवर पकडले असून दोघांनाही अटक केली असुन त्यांच्याविरुध्द खल्लार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला रात्री एक वाजता दिघी फाट्यावर रोहित्र संचामधून दोघेजण ऑइल चोरी करीत असल्याची माहिती खल्लार महावितरणचे शाखा अभियंता निखिल पडोळे यांनी 112 नंबरवरवरुन दिली. त्यानुसार खल्लारच्या ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटेखेडे पोलिस कर्माच्या-यांसह दिघी शेतशिवारात गेले असता त्यांना इंडिका गाडी क्रमांक MH 19,X 6323 महिमापूर ते दिघी रोडने दिसली दुय्यम ठाणेदार अनुराधा पाटेखेडे यांनी गाडी थांबवून विचारणा केली असता गाडीत बायोडिझेल असल्याचे दोघांनी सांगितले.
इंडिका गाडीची झडती घेतली असता गाडीतील डिक्कीत असलेल्या कॅनमध्ये रोहित्र संचावरील ऑइल आढळले.
खल्लार पोलिसांनी आरोपी शेख रिजवान शेख उमर वय 25 वर्ष रा असिम नगर अमरावती, शेख फैजान शेख शफी वय 18 वर्ष रा असिम नगर अमरावती यांना ताब्यात घेऊन अटक केली व त्यांच्याजवळील 225 लिटर ऑइल किंमत 15,525रुपये तसेच इंडिका गाडी किंमत 80,000 रुपये असा एकुण 95,525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व त्यांच्याविरुध्द अप न278/22,भारतीय विद्युत कायदा कलम 136 नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार चंद्रकला मेसरे करीत आहेत.