प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
१६७ हायवे चौपदरी रस्त्याच्या मजबूतीकरणाचे बांधकाम व डांबरीकरणाचे काम म्हणजे निकृष्ट दर्जा अंतर्गत बोगस कामाचा उत्तम नमुना आहे असेच म्हणावे लागेल.
या रस्त्याच्या बांधकामांचे निकृष्ट दर्जाचे साहित्य बघितले व बांधकामाची कार्यपद्धत बघितली तर हा रस्ता केवळ देखावा म्हणून चोपडा करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे.
१६७ हायवे रस्त्याचा अंदाजपत्रक आराखडा म्हणजे रस्त्यावर केवळ मुलामा देणारी कार्यपद्धत असल्याचे कंपनीच्या बांधकाम कार्यपद्धती वरुन निदर्शनास येते आहे.
सदर रस्त्याच्या बांधकामांची व इतर कामांची देखभाल करणारे अभियंता का म्हणून मुंग गिळून गप्प बसले आहेत?याचे वास्तव्य चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांपुढे येणे आवश्यक आहे.
ज्या कंपनीला,१६७ हायवे रस्त्याच्या मजबूतीकरणाचे बांधकाम,मोऱ्यांचे बांधकाम,डांबरीकरणाचे काम देण्यात आले आहे,त्या कंपनीचे दोन संचालक रस्ता बांधकाम संबंधाने अनुभवी आहेत काय?या बाबत शंकाच आहे.
मात्र,१६७ हायवे रस्ता संबंधाने सर्व प्रकारच्या कामावर एकप्रकारे अदृश्य शक्तींची माया आहे,असेच समजून सदर रस्त्याच्या बोगस कामाकडे संबंधित सर्व अभियंता द्वारा दुर्लक्ष केले जात आहे.तद्वतच सदर रस्त्याचे सर्व प्रकारचे कामे अंदाजपत्रक आराखडा प्रमाणे होत नसल्याचे स्पष्ट आहे.
याचबरोबर नागरिकांच्या लक्षात येवू नये म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील १६७ हायवे मार्गाच्या कंत्राटदार प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नावही मजेशीरच आहे..
(पुढच्या भागात सविस्तर माहिती.)