कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
पारशिवनी तालुक्यातील १७ गट ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.याकरीता सरपंच पदासाठी ५५ तर सदस्य पदासाठी ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
रविवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत मतदान होणार अशी माहिती तालुका निवडणुक अधिकारी तहसीलदार रणजीत दुसावार व सहायक निवडणुक अधिकारी यानी दिली आहे.
एकुण ५१ मतदान बुथ वर अंदाज २५० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.एकुण २१ हजार १४४ मतदाता असून यात महिला मतदाता १० हजार २२५ आहेत.
निबा येथे- ११८६,कोलितमारा-१४४२,चारगांव-१८४४,पालासावली-१२९१,टेकाडी-५२२,हिंगणा-९६६,वराडा-१८७५,उमरी-९४६,गवना-७१२,आमडी-१४८१,सावळी-९७७, गुंढरी-१११६,डोरली-१५४९, केरडी-११९२,बनपुरी-१६१५,भागीमहारी-१५८७ आणी घाटरोहणा गाम पंचायत येथे ११४० मतदाता असून मतदानाच्या दिवशी ते मतदान करणार आहेत.
तसेच महसुल विभाग कृ्षी विभाग, पंचायती विभाग, पोलिस विभागा मतडाना करिता बंदोबस्तात तयार करण्यात करण्यात आले आहे पोलिस विभागा तर्फे चोख व कड़क बडोबस्त लावण्यात आल्याची च माहीती पो नि यानी दिली , दुसऱ्या दिवशी सोमवार ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल.९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
या गटग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रणजित दुसावार नायब तहसीलदार राजाराम आडे,प्रकाश हारगुळे,रमेश पागोटे,पदमाकर बाळापूरे,योगराज खोपे,प्रशांत मंडपे,राजेश बोबडे,दुर्गा कोडापे,तेजराम राठोड,अवि मेश्राम,दिपक कत्रप,गजानन गोतमारे,राजेन्द्र भोंगाडे,अंकित वाघमारे, देवानंद खंडाते,चंदा खोब्रागडे,राजु वैरागडे,सुरेश धूर्वे,ऐश्वर्या कठाने,मंगेश भागडकर,अभय बेदरे,धरमसिंग लांजेवार,मोरेश्वर शेंडे,रवी झोडापे,सुनिल जाधव,मिथिलेश कोल्हे,आकाश चोपकर,जमील शेख,राजेंद्र उबाळे,जिवन पाटील,सुरेंद्र मामडीवार,सुनिल जाधव,प्रभाकर सूरजुसे,प्रशांत राऊत,जवाहर एस.चौहाण,रविंद्र शिवार उके,दिपक दिवटे,सुधाकर बघमारे,संघमित्र पाटील,नंदलाल नारनवरे,विनोद झाडे सह तालुका तिल विभीन्न कार्यालयीन पदाधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस विभाग निवडणुकित अथक परिश्रम घेत आहे.