युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ओळखल्या जाणाऱ्या रिपब्लिकन सेनेचे पश्चिम विदर्भ जिल्हाप्रमुख व निष्ठावंत समाजसेवक कोणतीही जात पात न पाहता नेहमी मदत करणारे संजयभाऊ चौरपगार यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे .मात्र रिपब्लिकन सेना पक्ष मधून आपला राजीनामा का दिला हा प्रश्न विचारले असता व सदर बाबीची माहिती घेत असताना संजयभाऊ चौरपगार यांनी रिपब्लिकन सेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यावर आरोप करत आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या माध्यमातून मी तालुका पदाधिकारी कार्यकारणी संघटित केली होती व संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या कार्याक्षेत्रात मी कुठेही कमी पडू दिले नाही.
तद्वतच माझ्या पदाचा कुठेही गैरवापर न करता माझ्या कामावर निष्ठावंत राहिलो व दिवस रात्र पक्षाच्या विस्तार करिता कार्य केले तरी मात्र रिपब्लिकन सेना पक्षाचे पदाधिकारी यांनी मी कुठलेही काम करत नाही असे खोटे आरोप करून माझे अंतर्मन दुखावले आहे.
ज्या ठिकाणी निष्ठावंत राहूनही बदनामी होत असेल त्या ठिकाणी मी कार्य करणार नाही असल्याचे संजयभाऊ चौरपगार यांनी सांगितले. भविष्यात कोणत्या पक्षांमध्ये प्रवेश करणार हे प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की जिथे आत्मसन्मान मिळेल तो पक्ष माझा आहे भाजपा सोडून कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करू शकतो रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष यांच्यासह एकूण 12 तालुका प्रमुखांनी पण आपले राजीनामे दिले आहेत ज्यामध्ये बाबुराव नितनवरे ( दर्यापूर ), शालिकराम उईके ( अंजनगाव ), विजय नितनवरे ( अचलपूर ) शिवदास भिलावेकर (चिखलदरा) रामा मालवी (धारणी ), शुभम इंगळे (भातकुली ), संजय शंकरपाळे (अमरावती ), धम्मपाल गजभिये (धामणगाव), सुदर्शन खरात ( मोर्शी ), श्रीकृष्ण तंतरपाडे (चांदूरबाजार ), राजरत्न रामटेके (चांदुर रेल्वे ), गणेश पवार (तिवसा ) ह्या एकूण बारा तालुका प्रमुखांनी पण आपले राजीनामे दिले आहे आता माजी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष व त्यांचे सहकारी कोणत्या पक्षात प्रवेश घेणार हे पाहणे योग्य ठरणार आहे.