युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
खल्लार पोलिस स्टेशनला आरोपीविरुध्द दखलपात्र गुन्ह्याची नोंद असतांनाही पुन्हा फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दखलपात्र गुन्ह्यातील आरोपीने दिली आहे.
खल्लार फाटा येथे पंडीतराव वानखडे व विनायक वानखडे यांचे हॉटेल आहे पंडीतराव वानखडे यांचे खाली हॉटेल असून हॉटेलच्या वर ते पत्नी व मुलासह राहत होते.
दि 26 ऑगस्टच्या रात्री आरोपी अनिकेत वानखडे याने पंडीतराव वानखडे हे त्यांच्या कुटुंबासह झोपले असता त्यांच्या राहत्या घरात पेट्रोल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने तिघांचा जिव वाचला मात्र त्या घटनेत तिघेही जखमी झाले होते. सदर घटनेची तक्रार खल्लार पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.
खल्लार पोलिसांत सुरुवातीला अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासात सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अनिकेत वानखडे यानेच पेट्रोल टाकून जाळल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरोपीविरुध्द खल्लार ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यावरुन न्यायालयाने त्यास शिक्षा सुनावली व त्याची रवानगी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली.कारागृहातून जामिनवर बाहेर आल्यावर आरोपी अनिकेत वानखडे याने पंडीतराव वानखडे यांना ते हॉटेलवर असतांना त्यांना माझ्या नादाला लागू नकोस मागच्या वेळेस तुम्ही जिवंत वाचलास आता जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली.या धमकीमुळे पंडीतराव वानखडे हे भयभीत झाले असून याबाबतची तक्रार त्यांनी खल्लार ठाण्यात दाखल केली असून खल्लार पोलिसांत आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.