युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
कोळी समाजाचे युवा नेते तसेच शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक विशाल नानासाहेब बगाळे (नांदरून) यांच्या नेतृत्वात दर्यापूर तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
समस्त कोळी समाजाच्या न्यायहक्कासाठी दर्यापूर तहसील कार्यालया समोर कोळी समाज बांधवांना
अनुसूचित जमातीचे दाखले
देण्यात यावे,याकरिता कोळी समाज बांधवांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.१९९८ पासून शासनाने कोळी समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण बंद केल्याने समाजामध्ये आर्थिक दुर्बलता आणि मागासलेपणा वाढला आहे.
भारतीय राज्यघटने नुसार कोळी समाज हा आदिवासी आहे.मात्र महाराष्ट्र शासन त्यांना अनुसूचित
सोबत घेवून आरक्षणापासून वंचित ठेवत असल्याने समाजावर एक प्रकारे अन्याय होत आहे.या अन्यायाच्या विरोधात दर्यापूर तालुक्यातील कोळी जमातीच्या बांधवांनी दर्यापूर तहसील वर 1 सप्टेंबर 2023 पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
या सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आमरण उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेने ने युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा दिला.यावेळी सागर वडतकर,मनोज लोखंडे,मोहन खरबळकार,दत्ता राणे,सतीश घाटे,मनोज बगाळे,भरत हिंगणीकार,बच्चू पोटे,धनंजय पवार,सतीश जमणिक,स्वप्नील विल्हेकर इत्यादी शिवसैनिक तसेच कोळी समाजाचे नागरिक उपस्थित होते.