अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र सिंदेवाही,नियतक्षेत्र डोंगरगांव मधील मौजा भेंडाळा गट क. १२ श्रीमती.कमलाबाई महादेव पेंदाम यांचे शेतामध्ये ११ के. व्ही.डीस्ट्रीब्युशन विद्युत ट्रान्सफॉर्मर वर बिबट (मादी) व माकड (बंदर) मृत अवस्थेत आढळुन आले आणि एकच खळबळ उडाली.
बिबट व बंदर विद्युत ट्रान्सफॉर्मरवर मृत्यू पावले असल्याची माहीती मिळाताच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) सिंदेवाही हे अधिनिस्त वनकर्मचारी व RRU चमु सिंदेवाही यांना घेवून मोकास्थळी पोहचले.
घटनेची पाहणी केली असता,घटनास्थळावर १ बिबट (मादी) व माकड (बंदर) मृत अवस्थेत असल्याचे आढळले.
सदर घटनेची माहीती वरिष्ठ अधिकारी व विज वितरण विभाग,सिंदेवाही यांना भ्रमणध्वनी व्दारे कळविण्यात आली.त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.मात्र,सदर बिबट्याचे सर्व अवयव शाबुत होते.
पंचनामा केल्यानंतर उपस्थितअधिका-याच्या समक्ष मौका पंचनामा नोंद करण्यात आला.
सदर मृत बिबट्याला (लकडा डेपो) मध्यवर्ती काष्ट भांडार,सिंदेवाही येथे डॉ. विनोद सुरपाम,पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, सिंदेवाही,डॉ.शालीनी लोंढे,पशुधन विकास अधिकारी,सिंदेवाही यांनी सदर वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन करून उत्तरिय तपासणी करीता नमुने (विसेरा) घेण्यात आले.
शवविच्छेदनाची संपुर्ण कार्यवाही करून सदर वन्यप्राण्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर वरील सर्व अधिकारी व पंचासमक्ष दोन्ही वन्यप्राण्यांचे संपूर्ण अवयव पुर्णपणे जाळण्यात आले .
यावेळी श्री.एम.बि.चोपडे,सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव) ब्रम्हपुरी वनविभाग,ब्रम्हपुरी श्री. विवेक करंबेकर मानद वन्यजीव रक्षक ब्रम्हपुरी वनविभाग व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. यश कायरकर अध्यक्ष स्वाब नेचर केअर फाउंडेशन,सदस्य जिवेश सयाम,नितीन भेंडाळे,महेश बोरकर,गणेश गुरनूले,तुषार शिवनकर,आकाश मेश्राम,शुभम निकेशर व विज वितरण विभागाचे कर्मचारी हे हजर झाले.
***
या घटने करीता विद्युत विभागच जिम्मेदार…
विशेष म्हणजे तीन दिवसापूर्वी पासूनच याच डीपीवर एक बंदर करंट लागून मेलेला होता.सदर ट्रान्सफॉर्मर गावातंर्गत एका घराजवळील शेतामध्ये आहे.त्यामुळे गावातली लाईन सतत ये जा – ये जा करत होती. तरीही याकडे विद्युत विभागाने निष्काळजीपणे अक्षम्य दुर्लक्ष केला असल्याचे लक्षात येते आणि त्या मृत बंदराला खाण्याच्या नादात रात्रीच्या सुमारास डीपीवर चढलेल्या एक ते दिड वर्ष वयाच्या मादा बिबट्याला आपला जीव गमवावा लागला.
यामध्ये विद्युत विभागाची दिरंगाई निदर्शनास येते आणि याच दिरंगाई मुळे वर्षाला शेकडो वन्यजीव मारले जातात,याचेच उदाहरण द्यायचे झाले तर गत महिन्यामध्ये तीन आक्टोंबरला चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली हृदयद्रावक घटना म्हणजे एका,”हत्तीचा,करंट लागून मृत्यू झाला होता.
त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा करंट लागून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.यातच दोन दिवसापूर्वी चिमूर तालुक्यातील मदनापूर येथे एका दहा वर्षीय मुलाचा शेतामध्ये लावलेल्या अवैद्य करंट ला लटकून मृत्यू झाल्याची घटना उजागर झाली.
वर्षा लगत अशा शेकडो घटना विद्युत विभागाच्या निष्काळजी पनामुळे घडत असतात.आणि अशा घटना टाळून नेण्याकरिता सतत वन विभागात गस्त घालून देखरेख करत असतो.
मात्र विद्युत विभाग याकडे कधीच गांभीर्याने पाहत नाही व कोणत्याही घटना झाल्यास त्याचे खापर हे वनविभागावर फोडले जात असल्याचे पुढे आले आहे.