धानोरा/भाविक करमनकर 

 

  धानोरा तालुक्यातील प्रथम क्रमांकावर मुरुमगाव ग्रामपंचायत आहे परंतु हीच ग्रामपंचायत अनेक समस्या ने ग्रस्त आहे म्हणून मुरूमगाव येथे आज दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोज गुरूवार ला ठिक 1:00 दुपारी समस्येवर निवारण व चर्चा करण्या बाबत सभेचे आयोजन करण्यात आले याआधी १९ ऑक्टोबर ला चक्का जाॅम आंदोलन करून समस्या कडे लक्ष वेधले होते त्या बैठकीत समस्या चे निराकरण करण्यात करण्यासाठी 3 नोव्हेंबर ला बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हि सभा मुरुमगाव ग्रामपंचायत येथील सभागृहात आयोजित करण्यात आले या सभेचे अध्यक्ष धानोरा चे तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले व या सभेत प्रमुख उपस्थिती म्हणून बी डी ओ प.स.धानोरा एस.आर. टिचूकले, गट शिक्षण अधिकारी धानोरा व्ही. आर. आरवेली, विस्तार अधिकारी जि.प.गड. अमरसिंग गेडाम, नायब तहसीलदार धानोरा डि.के.वाळके, उपप्रादेशिक व्यवस्थापक एच.एस.सोनवणे, जि.प.बांधकाम विभाग बि.सी.धार्निक, जि.प. बांधकाम विभाग ए.एम.अगळे, कार्यकारी अभियंता धानोरा डी.डी.शेंडे, धर्मानदं मेश्राम, केन्द्र प्रमुख अरूण सातपुते, तलाठी मेश्राम, क्षेत्र साहाय्यक पक्षिम मुरुमगाव पि.जी.देशपांडे, पशुधन विकास अधिकारी डा.रोहन गालफोडे, टी एच ओ धानोरा डाॅ.ए.एस.डेकोगाडे, उप अधिक्षक भूमिअभिलेख धानोरा पोलीस.एम.नाकाडे, वैद्यकीय अधिकारी मुरुमगाव डाॅ. राहूल बनसोड, क्षेत्र साहाय्यक वाय.सि.करेवार, क्षेत्र साहाय्यक सयाम,पोलीस उपनिरीक्षक मुरुमगाव चंद्रकांत धनके, सचिव ग्रामपंचायत मुरुमगाव वि.बि.आखाळे, डाॅ.सुनिल मडावी, माजी पचांयत समिति सभापती धानोरा अजमन मायाराम रावते, माजी जि.प.सदस्य सौ.लताताई पूगांटे, सरपंच मुरुमगाव शिवप्रसाद गवरना, उपसरपंच मुरुमगाव मथनूराम मलिया, मूनिर शेख, शिवनाथ टेकाम, पोलीस पाटील वसतं कोलीयारा, चावनशाह मडावी,भूपेनद्रशाह मडावी, सरपंच हिरंगे कवलसिगं राणा, सरपंच पन्नेमारा हरीश धुर्वे, निरंगसाय मडावी, मदनलाल बढई, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अंजूताई मैदमवार, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोठवार, ग्रामपंचायत मुरुमगाव येथील समस्त नागरिकांनी उपस्थिती दश॔विली, 

          चक्का जाम आंदोलना मध्ये पदाधिकाऱ्यांकडून विविध विषयांवर मागणी साठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आंदोलनात पुढील विषयावर चर्चा झाली १) को-ऑफरेटिव बैकं चि शाखा उघडणे ॆ२( ग्रामीण रुग्णालय (३)मुरुमगाव व औधीं मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण (४) डाॅ.छाया बाबूराव उईके याची मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यथे नियुक्ती करण्यात (५)संपूर्ण सबंधित विभागाचे कर्मचारीवर्ग व अधिकारी यांनी त्वरीत आपल्या मुख्यालयात हाजिर राहावे (६)सबंधित महत्वाचे मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण मध्ये मुरुमगाव ते औधी, मुरुमगाव, तूमळीकसा, हिरंगे, कूलभटी बोदनखेळा मार्ग, पन्नेमारा व सिंदेसूर मार्ग निर्माण कार्य खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे (७)वनपटटे धारकास 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे पूरावा सादर करण्यात यावा, व इतर नागरिकांना पिढीचा पूरावा सादर करण्यात याव(८) शासकीय पोस्ट बेसिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे वर्ग 11,12,वी चे वर्ग सुरु करावे इत्यादी मागणी घेऊन विषेश चर्चा करण्यात आली, धानोरा तालुक्याचे तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी कास्ट सर्टिफिकेट करीता 1950 पूर्वीचे पूरावे गरजेचा सांगीतलेे. धानोरा तालुक्यात एकूण 14 पशूऔषाधलय आहेत आणी पशू वैद्यकीय अधिकारी 3 मुरुमगाव येथे पशुवैद्यकीय अधिकारी ची नियुक्त करण्यात यावी मागणी बद्दल चर्चा करण्यात आले, व पशूऔषाधलय मुरुमगाव येथील सबंधित कर्मचारीवर्ग पैशे घेण्याचे आरोप लावण्यात आले.

मौजा मुरुमगाव येथे समाजकल्याण तर्फे मूल व मुलीचे वसतीगृहात बर्याच वर्षांपासून मुलाची संख्या नाही या बद्दल चर्चा करण्यात आले,वनविभाग तर्फे क्रीडांगण व बगीचा त्या नंतर तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी संजय गांधी,राष्ट्रीय कुटूंब साहाय्यक योजना, व श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजने अंतर्गत धनादेश माहे सप्टेंबर 2022 पर्यंत जमा करण्यात आले आहेत असे सांगीतले.

तहसीलदार कल्याण कुमार दाहाड यांनी सबंधित विषयावर चर्चासत्र करून नोंद केली व जिल्ह्य़ा पातळीवर पूर्ण करण्याचे आश्वासन आंदोलन धारकास दिले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com