आता लवकरच ‘लालपरी’ मधिल टिकिट व्यवहार होणार कॅशलेस…. — प्रवाशांसह वाहकाचीही ‘चिल्लर’च्या त्रासातून होणार सुटका….

प्रितम जनबंधु

संपादक 

       गडचिरोली : तंत्रज्ञानाच्या जीवनवाहिनी असलेल्या ‘लालपरी’मध्येही आता व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यावर भर दिला जात आहे. गडचिरोली विभागीय कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील गडचिरोली (Gadchiroli) व अहेरी या दोन आगारात 285 आधुनिक इंडिक्स मशीन दाखल झाल्या आहेत. ही मशीन अपडेट करून वाहकाला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाच्या ”लालपरी” मध्येही ‘कॅशलेस’ व्यवहार होणार आहेत.

           शासनाने विविध कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक कामे ऑनलाईन केली आहेत. त्यामुळे विविध कार्यालयीन ‘कॅशलेस’ करण्यावर भर दिला जात आहे. बऱ्याच लोकांनी ‘कॅशलेस’ पद्धतीचा अवलंब केला आहे. अनेक छोटे-मोठे पे, फोन पे आदींच्या माध्यमातून केले जात आहे. अनेकवेळा प्रवाशी आणि वाहकात वादही होतात. अनेक वाहक परत करावयाचे पैसे तिकिटाच्या मागे लिहून देतात. बसमधून प्रवासी उतरल्यानंतर 2 ते 3 जणांमध्ये एक नोट देऊन निघून जातात. त्यामुळे पैसे आपआपसात वाटून घेण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडते. अशी अनेक उदाहरणे बस प्रवासात पाहायला मिळतात. मात्र, आता ऑनलाइन पेमेंटमुळे प्रवाशांसह वाहकाचीही ‘चिल्लर’च्या त्रासातून सुटका होणार आहे.

           गेल्या वर्षीही काही मशीन दाखल झाल्या होत्या.राज्य परिवहन महामंडळ एक वर्षांहून अधिक काळापासून ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील गडचिरोली 182 तर अहेरी आगारासाठी 103 मशिन देण्यात आल्या आहेत. या मशीन सुरळीत सुरू आहेत.