सावली (सुधाकर दुधे)

         ३ नोव्हेंबर रोजी

 पहाटे दरम्यान चामोर्शी ते मुल मार्गावरून अवैध गोवंश जनावरे वाहतुक होणार आहे अशी गोपनीय माहीती प्राप्त झाली.

        त्यावरून हरणघाट येथे अचानक नाकाबंदी लावून वाहने चेक केली असता सकाळी अंदाजे ०५:३० च्या सुमारास चामोर्शी दिशेकडून येणारे दोन आयशर ट्रक एकामागोमाग एक दुर थांबले. 

      पोलीसांची नाकाबंदी पाहून दोन्ही ट्रकचे चालक व क्लीनर त्यांचे ट्रक जागीच सोडून पळून गेले.

     सावली पोलिसांनी अनेकदा अवैध गोवंश जनावरांच्या वाहतूक बाबतीत कारवाई केली असली तरी मात्र आरोपीना फरार होण्यात नेहेमीच यश प्राप्त होत असते हे सत्य लक्षात घेतले तर आरोपींना गजाआड कोण करणार?हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे. 

        दोन्ही ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये दोन्ही मिळून लहानमोठे एकूण ४१ गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयतेने कुरपणे तोंडाला मोरके व दोराने पाय बांधून कोंबुन बसवून ठेवलेले दिसून आले.

     दोन्ही ट्रकमधील मिळून ४१ गोवंश जनावरे कींमत अंदाजीत ४ लाख १० हजार रूपये,२ आयशर कंपनीचे ट्रक क. MH- 34,BZ – 0237 व MH- 34,BZ-3609 कींमत अं ३० लाख रू असा एकूण ३४ लाख १० हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. 

    सदरचे जप्त जनावरे ही त्यांच्या सुरक्षीतता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आली. सदर गुन्ह्यातील अज्ञात चार फरार आरोपी यांचेविरूद्ध महाराष्ट्र पशू संवर्धन कायदा कलम प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम , महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटरवाहन अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

      सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री.रविंद्र परदेशी,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार दर्शन लाटकर , विशाल दुर्योधन , धिरज पिदुरकर , स्वप्नील दुर्योधन , दिपक चव्हाण यांनी केली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com