चिमूर स्केटिंग अकॅडमीने मिळविले भरगोस यश….

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :-  2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने ओम साई बहुउद्देशीय शिक्षण संस्था तसेच लालसिंग स्केटिंग अकॅडमी च्या वतीने नागपूर येथील सेंट झेवियर्स स्कूल येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

            स्केटिंग स्पर्धेत नागपूर, उमरेड, चिमूर, सावनेर, काटोल येथून जवळपास 250 च्या वरून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत चिमूरच्या स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत 6 पदक पटकाविले त्यात 5 स्वर्ण पदक व 1 रोप्य पदकाचा समावेश आहे.

           स्पर्धेत 4-6 वर्ष वयोगटातील रिद्धीशा उमेश काटेकर हिने सुवर्णपदक तसेच 6 ते 8 वयोगटातील स्नेहल प्रशांत सूर्यवंशी हिने सुवर्णपदक, 8 ते 10 वयोगटातील हृदयांश उमेश काटेकर याने स्वर्ण पदक, 10 ते 12 वयोगटात अनुश श्रीकांत मारगोनवार याने सुवर्णपदक, 12 ते 14 वयोगटातील स्वर्णिका श्रीकांत मारगोनवार हिने स्वर्ण पदक तसेच चैताली चंद्रकांत सोनवाने हिने रौप्य पदक पटकावले.

          सर्व विजेते स्केटर्स चिमूर स्केटिंग अकॅडमी चिमूरचे नियमित खेळाडू आहेत सर्व खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आपले माता पिता व कोच रोशनी उमेश काटेकर यांना देत आहे. स्केटिंग अकॅडमी चिमूर चे व सर्व विजयी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे सर्व पालकांकडून तसेच चिमूर वासीयांकडून अभिनंदन केल्या जात आहे.