आळंदी शिवसेना शहरप्रमुखपदी रोहीदास तापकीर,शहर संघटकपदी आनंदराव मुंगसे यांची नियुक्ती…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक, आतापर्यंत शिवसेनेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले आणि पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय असणारे आळंदी नगरपरीषदेचे शिवसेनेचे पहीले नगराध्यक्ष रोहीदास तापकीर यांची आळंदी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तापकीर यांची शहरप्रमुख पदावर नियुक्ती करून आळंदी शहर शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. 

           शिवसेना आळंदी शहर संघटक म्हणून आनंदराव मुंगसे यांची फेर निवड झाली आहे. शशिकांतराजे जाधव, आशिष गोगावले, तुषार नहार, मंगेश तिताडे, सुरज वाळुंजकर, गणेश नेटके यांची उपशहरप्रमुख तर विभागप्रमुख म्हणून संतोषराजे भोसले, अशोक कदम, विकास खरपुडे, पांडुरंग सावंत यांची नियुक्ती केली आहे.

         भविष्यात आळंदी नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणूकीच्या दृष्टीकोनातून शिवसेना आळंदी शहर संघटन बांधणी केली जात आहे. आळंदी शहरात शिवसेना घराघरात नेणार असून, मजबूत बांधणी करणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे,’ अशी प्रतिक्रिया तापकीर यांनी व्यक्त केली.