ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – संपूर्ण महाराष्ट्रात उमेद कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि कुरखेडा इथ भेट दिली असता दी. 3/10/2024 पासून कामबंद आंदोलन सुरू केलं असून एकमेव एकच मागणी पूर्ण होई पर्यंत कामबंद राहील असे आंदोलन स्थळी आंदोलकांनी बोलून दाखविले.
प्रमुख मागणी उमेद अभियान (MSRLM) ला ग्रामविकास व पंचायतराज विभागांमधील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे.
करिता आरमोरी व कुरखेडा येथील उमेद कार्यालयासमोर बॅनर लावून बसले आहेत.