अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
सिंदेवाही – तालुक्यातील मौजा गुंजेवाही हे परिसरातील मुख्य ठिकाण असून बाजारपेठ आहे.या नागरिशी परिसरातील अनेक गावे जोडली असून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी गुंजेवाही येथील आरोग्य वर्धिनी केंद्र मुख्य दुवा आहे.
परंतु या आरोग्य वर्धिनी केंद्रात कर्मचारी वेळेवर हजर होत नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या तपासणी साठी पायपीट करावी लागत आहे.एरवी आपला जीव गमवावा लागत आहे.
मुख्यालयी निवासी राहण्याचे शासनाचे कडक आदेश असताना सुद्धा शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत असल्याचा प्रकार आज घडला.यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासकीय निवाशी स्थानावरून दवाखान्यात येण्यास उशीर होत असल्याने डॉक्टर वेळवर पोहचू शकत नाही.त्यामुळे नागरिकांना तपासणी करण्यासाठी वाट बघावे लागत आहे.
सध्या आजारी पडलेल्या रुग्णाची संख्या बऱ्याच प्रमाणात असून तपासणी करण्यासाठी जवळपास 50 ते 60 रुग्ण आरोग्य वर्धिनी केंद्रात गेले असता कर्मचारी वेळेवर उपस्थित न झाल्याने त्यांना त्रास सहन करावा लागला असल्याचा आज प्रसंग ओढावला.
५ ते ७ रुग्ण विना इलाजाने परत गावाकडे निघाले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.असा निंदनिय प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला आज मिळाला.
तसेच कर्मचारी उशिरा येत असल्याने एखाद्या रुग्णाला जीव सुद्धा गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही.गुंजवाही परिसर हा आर्थिक दृष्ट्या कमजोर असून येथील नागरिक खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ शकत नाही.
त्यामुळे येथील आरोग्य वर्धिनी केंद्र नागरिकांसाठी वरदान आहे.परंतु अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना आरोग्याच्या सेवा वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नर्स नेहमी लोकांसोबत अरेरावी करीत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
आज प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही येथे उपचारासाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणजेच लोकप्रतिनिधी गेले असता त्यांचावर सुद्धा हाच प्रकार ओढावलेला आहे.
एखाद्या लोकप्रतिनिधी आणि रुग्ण कल्याण समिती सदस्यासोबत नर्स अरेरावी करीत धमकीवजा म्हणाल्या,”तुला काय करायचं ते कर,तुला कोठ जायचं असेल तिथे जा,माझे तू काहीच करणार नाही.
असा एकेरी भाषेचा उल्लेख रुग्ण कल्याण समिती सदस्यांच्या बद्दल नर्स करीत असतील तर सामान्य जनतेचे हाल काय असणार?हे सांगायला नको.
आणि….
हो मी रुग्णांचा इलाज करणार नाही, तर मी सुट्टीवर जाणार अशी धमकी नर्सताईने वारंवार दिली… अशा मुजोर आणि कामचुकार कर्मचारी (नर्स) वर त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रुग्ण कल्याण समिती सदस्य तसेच ग्रा.पं.सदस्य पुनेश गांडलेवार यांनी दिला आहे.